भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांमधील केमिस्ट्री चाहते जाणून आहेत. हे दोघे जणू काही एकमेकांसाठी जन्माला आले असावेत अशाप्रकारची त्यांच्यात बॉण्डिंग आहे. पण नुकतेच विमानतळावर जेव्हा हे दोघे बघावयास मिळाले तेव्हा अनेकांच्या मनात प्रश्नांनी घर केले. कारण यावेळी विराट डॅशिंग अंदाजात दिसून आला तर त्याची पत्नी अनुष्का काहीशी नाराज असल्याचे तिच्या चेहºयावरून स्पष्टपणे दिसून आले. कदाचित विराटच्या कुठल्यातरी गोष्टीवरून ती त्याच्यावर नाराज झाली असावी,  कारण जेव्हा विराट पुढे चालत होता तेव्हा ती त्याच्याकडे बघतही नव्हती. विराटने  अनुष्काचा हात धरला होता. तो पुढे चालत होता तर ती त्याच्या मागे येत होती. दोघांचेही चेहरे गंभीर दिसत होते. अनुष्काच्या चेहºयावरील ताण तर स्पष्टपणे दिसत होता. ती अतिशय गंभीर होऊन विराटच्या मागेमागे चालत होती. कदाचित कुठल्यातरी गोष्टीवरून दोघांचे एक मत झाले नसल्याने त्यांचे चेहरे गंभीर झाले असावेत असेच काहीसे फोटोवरून दिसून येते. 

दरम्यान, या दांपत्याच्या लग्नाला जेमतेम महिने झाले आहेत. अतिशय थाटामाटात या दोघांनी साताजन्माच्या गाठी बांधल्या. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इटली येथे अतिशय शाही पद्धतीने त्यांनी लग्न केले. पुढे अगोदर दिल्ली अन् नंतर मुंबई येथे लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन दिले. लग्नानंतर काही दिवसातच दोघेही त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त झाले. 
Web Title: Dashing looks like Virat, but Anushka was angry?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.