ठळक मुद्देमी आणि परवीन एकमेकांच्या आयुष्यात आलो, त्यावेळी खूपच तरुण होतो. जवळजवळ चार वर्षं आम्ही एकत्र राहिलो. आम्ही एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला. पण काही वर्षांनंतर आम्ही वेगळे व्हायचे ठरवले. पण त्यानंतरही आम्ही खूप चांगले फ्रेंड्स होतो.

डॅनी डेन्झोपा यांना बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायकांपैकी एक मानले जाते. त्यांच्या देवता, अग्निपथ, सनम बेवफा, हम, खुदा गवाह, क्रांतीवीर, विजयपथ, घातक, बरसात या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. त्यांनी नुकतेच मनकर्णिकाः क्वीन ऑफ झाँसी या चित्रपटात काम केले होते. 

 

डॅनी यांनी कधीच आपले खाजगी आयुष्य मीडियापासून लपवले नाही. ते एका बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नात्यात होते हे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये देखील कबूल केले आहे. डॅनी आणि परवीन बाबी यांच्या नात्याबद्दल डॅनी यांनी फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. परवीन या खूप चांगल्या अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगल्या व्यक्ती होत्या असे देखील डॅनीने या मुलाखतीत कबूल केले होते.

डॅनी यांनी या मुलाखतीत सांगितले होते की, मी आणि परवीन एकमेकांच्या आयुष्यात आलो, त्यावेळी खूपच तरुण होतो. जवळजवळ चार वर्षं आम्ही एकत्र राहिलो. त्याकाळासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. आम्ही एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला. पण काही वर्षांनंतर आम्ही वेगळे व्हायचे ठरवले. पण त्यानंतरही आम्ही खूप चांगले फ्रेंड्स होतो. त्यानंतर परवीनच्या आयुष्यात कबीर (कबीर बेदी) आला. कबीरसोबत ब्रेक अप झाल्यानंतर काही वर्षं ती महेश भट्टसोबत नात्यात होती. आम्ही दोघे अनेक वर्षं जुहूमधील एकाच सोसायटीत राहात होतो. आम्ही वेगळे झाल्यावरनंतरही अनेकवेळा ती मला जेवायला घरी बोलवायची. त्यावेळी मी अभिनेत्री किमसोबत नात्यात होतो. पण याची पर्वा परवीनला नव्हती. ती कोणत्याही वेळी माझ्या घरी यायची. किमसाठी हे सगळे समजणे खूपच अवघड होते. काही वेळा तर किमचे चित्रीकरण आटपल्यानंतर मी तिला चित्रपटाच्या सेटवरून माझ्या घरी घेऊन यायचो तर माझ्या घरात परवीन असायची. ती चक्क बेडरूममध्ये बसून व्हीसीआरवर चित्रपट पाहात राहायची. तिने हे वागणे मला आणि किमला विचित्र वाटायचे. पण त्यावर आपण केवळ फ्रेंड्स आहोत... आपल्यात तसे काहीही नाहीये असे म्हणते ती जोराजोरात हसायची. 


Web Title: Danny Denzongpa reveals all about Parveen Babi and their relationship
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.