'Dangal Girl', Zayara Wasim, air strikes! Cried crying crying !! | ​‘दंगल गर्ल’ जायरा वसीमसोबत विमानात छेडछाड! रडत रडत सांगितली आपबीती!!

‘दंगल’ चित्रपटात आमिर खानच्या आॅनस्क्रीन मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जायरा वसीम हिने विमानात छेडछाड झाल्याचा आरोप करत, सोशल मीडियावर  एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत जायरा रडत रडत आपली आपबीती सांगताना दिसतेय. दिल्ली ते मुंबई विमानात छेडछाड झाल्याचा आरोप जायराने केला आहे. ज्या व्यक्तिने जायरासोबत छेडछाड केली तो तिच्या मागच्या सीटवर बसलेला होता. जायरा या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवू इच्छित होती. मात्र प्रकाश कमी असल्याने तिला हे करता आले नाही. अर्थात तिने एक फोटो पोस्ट केला आहे. यात एका व्यक्तिचा पाय दिसतो आहे. जायराने व्हिडिओत सांगितल्यानुसार, ती विस्तारा एअरलाईन्समधून प्रवास करत होती. तक्रार करूनही विमानातील क्रू मेंबर्सनी तिची कुठलीही मदत केली नाही.
 


 ‘मागच्या सीटवर बसलेला एक वयस्कर व्यक्ति पायाने माझ्या मानेला आणि पाठीशा स्पर्श करत होता. अंधाराचा फायदा घेऊन त्याने हे चाळे चालवले होते. मी त्याला विरोध केला. पण त्याला ओरडून सर्वांना सांगेल, अशी धमकीही दिली. पण त्याच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. विमानात मी याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्नही केला. मात्र अंधारामुळे ते शक्य झाले नाही,’असे जायरा लाईव्ह व्हिडिओत सांगताना दिसतेय.  
 मुंबईत पोहोचल्या पोहोचल्या तिने इन्स्टाग्रामवर या घटनेबद्दल सांगितले. यावेळी ती स्वत:चे अश्रू रोखू शकले नाही. विमानात इतके सगळे लोक असूनही कुणीही माझ्या मदतीला आले नाही. क्रू मेंबर्सनीही माझी मदत केली नाही. मुलींची तुम्ही अशी काळजी घेणार का? असा सवाल तिने केला. 
जायराच्या या पोस्टनंतर तिच्यासोबत छेडछाड करणाºया व्यक्तिविरोधात कुठली कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  संबंधित विमान कंपनीने यासंदर्भात एक टिष्ट्वट करत, चौकशी सुरु असल्याचे म्हटले आहे. आम्ही जायरा वसीमसोबत आहोत. अशी वागणूक खपवून न घेण्याचे आमचे धोरण आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे, असे विमान कंपनीने म्हटले आहे.
 
Web Title: 'Dangal Girl', Zayara Wasim, air strikes! Cried crying crying !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.