'Dabangg' shared with Salman Khan; First Look of the Girlfriend song; NetKey took fun! | ​‘दबंग’ सलमान खानने शेअर केला गर्लफ्रेन्डच्या गाण्याचा फर्स्ट लूक; नेटक-यांनी घेतली मजा!

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याची नेटकºयांनी चांगलीच मजा घेतलीय. अजूनही हा ‘सिलसिला’ सुरू आहे. आता साक्षात ‘दबंग खान’ची मजा म्हणजे, खूपच झाले. पण नेटक-यांनी कुणाला सोडलेय? ‘दबंग खान’ही त्यातून सुटला नाही. आता हा सगळा मामला तुम्हाला कळायलाच हवा. तर त्याचे झाले असे की, सलमानने त्याची कथित गर्लफ्रेन्ड युलिया वंतूर हिच्या नव्या गाण्याचा फर्स्ट लूक आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला. ‘युलिया वंतूर आणि मनीष पॉल तुम्हाला तुमच्या येणा-या #harjai गाण्यासाठी शुभेच्छा,’ असे सलमानने लिहिले आणि  नेटक-यांच्या हाती आयते कोलित मिळाले. होय, याचवरून नेटक-यांनी सलमानची फिरकी घ्यायला सुरूवात केली.‘युलियाला अशीच गाणी दे. ‘रेस3’ चुकूनही देऊ नकोस. नाहीतर प्रेक्षक चित्रपटगृहातून पळून जातील,’ असे सलमानची ही पोस्ट पाहून एका युजरने लिहिले. अन्य एका युजरने थेट सलमानला लक्ष्य करत, ‘भाई, युलिया वंतूरपासून तर डेजी, रेमोपर्यंत सगळ्यांचेच करिअर बनवतो आहे,’ असे लिहिले. सलमानने अद्याप नेटिजन्सच्या या कमेंट्सवर काहीही उत्तर दिलेले नाही. त्याने ते दिलेच तर तो काय उत्तर देईल, हे पाहणे मात्र इंटरेस्टिंग असेल.  

ALSO READ :  ‘टायगर जिंदा है’ने सलमान खानच्याच ‘या’ चित्रपटाचे रेकॉर्ड केले ब्रेक!

गत वर्षभरापासून युलिया वेंटर भारतात असून ती हिंदी व पंजाबी गाण्याचे प्रशिक्षण घेत होती. मागील वर्षी युलियाचा हिमेश रेशमियासोबत एक अल्बमही रिलीज झाला आहे.  सलमान खान व युुलिया  यांच्या संबंधाची चर्चा मध्यंतरी चांगलीच रंगली होती. सलमान व युलिया लग्न करणार, इथपर्यंत ऐकवात आले होते. पण अद्याप असे काहीही कन्फर्म झालेले नाही. गेल्या वर्षभरापासून युलिया भारतात तळ ठोकून आहे.  खान कुटुंबियांसोबतही ती चांगलीच रमली आहे. खान कुटुंबियांच्या प्रत्येक खाजगी कार्यक्रमात तिची हजेरी असतेच असते.    
Web Title: 'Dabangg' shared with Salman Khan; First Look of the Girlfriend song; NetKey took fun!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.