दिग्दर्शक डेविड  आणि वरूण धवन या बाप लेकाच्या जोडीने 'मैं तेरा हीरो' आणि 'जुड़वा 2 ' सारखे हिट सिनेमे दिले आहेत.
आता पुन्हा ही जोडी 'कुली नं. 1' सिनेमाच्या माध्यमातून रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
होय, दिग्दर्शक डेविड धवन 'कुली नं-1' सिनेमा बनवणार असल्याची ब-याच दिवसापासून जोरदार चर्चा सुरू होती.

 

 

आता या सिनेमाबाबत अधिकृत माहिती समोर येत आहे. सिनेमात गोविंदाच्या भूमिकेत वरूण धवन आणि करिश्माच्या भूमिकेत सारा अली खान झळकणार आहेत. विशेष म्हणजे सारे वाद विसरून सिनेमाची घोषणा करण्यासाठी खुद्द गोविंदा उपस्थित राहणार आहे.

'कुली नं- 1' सिनेमाचा हा सिक्वेल असला तरी वरूणची वेशभूषाही कुलीसारखी नसून तो नॉर्मल जीन्स आणि टी-शर्ट अशा पोशाखातच दिसणार आहे. सध्या 'कुली नं-1' सिनेमाचे पोस्टर घेवून सारा आणि वरूण यांचे मिम्सही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. तुर्तास 'कुली नं-1' चा ही सिक्वेल असला तरीही आजच्या काळाला अनुरूप ठरेल अशीच सिनेमाची कथा असणार असल्याचे डेविड धवन यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. 

गोविंदा आणि डेव्हिड धवन हे एकेकाळी खूप चांगले मित्र होते. त्या दोघांच्या जोडीने कुली नं.1, हिरो नं 1 यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहे. डेव्हिडने दिग्दर्शित केलेल्या 17 चित्रपटांमध्ये गोविंदाने काम केले आहे. डेव्हिड धवनचा सिनेमा म्हटला की, त्यात गोविंदाची प्रमुख भूमिका असणारच असे जणू समीकरणच बनले होते. पण गेल्या काही वर्षांपासून गोविंदा आणि डेव्हिड धवनच्या जोडीचा एकही सिनेमा पाहायला मिळालेला नाही. तसेच एकेकाळचे अतिशय जवळचे मित्र समजले जाणारे गोविंदा आणि डेव्हिड धवन  एकमेकांचे तोंडदेखील पाहात नव्हते.खरं तर डेव्हिड धवन यांनी 'चष्मे बहाद्दूर' सिनेमात गोविंदाला घेणार असल्याचे वचन दिले होते.

मात्र डेव्हिड यांनी गोविंदाला दिलेला शब्द पाळला नाही आणि त्या सिनेमात गोविंदाला न घेता ऋषी कपूर यांना ऑफर करण्यात आला आणि याच कारणामुळे गोविंदा आणि डेव्हिड यांच्यात वाद झाला होता. मात्र या दोघांचे वाद आता मिटले असून खुद्द गोविंदा सिनेमासाठी वरूणला काही टीप्स देणार असल्याचेही बोलले जात आहे.  


Web Title: 'Coolie No.1' will be screened again, Varun-Sarah will be seen in the remake
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.