ही आहे अक्षय कुमारची ‘सूर्यवंशी’ गर्ल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 10:45 AM2019-04-22T10:45:01+5:302019-04-22T10:46:53+5:30

‘सूर्यवंशी’मध्ये अक्षयच्या अपोझिट कोण अभिनेत्री दिसणार, याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता त्याचाही खुलासा झालाय. होय, ‘सूर्यवंशी’मध्ये कतरीना कैफची वर्णी लागली आहे.

confirm katrina kaif to pair opposite akshay kumar in cop drama film sooryanvanshi | ही आहे अक्षय कुमारची ‘सूर्यवंशी’ गर्ल!

ही आहे अक्षय कुमारची ‘सूर्यवंशी’ गर्ल!

googlenewsNext
ठळक मुद्देया अ‍ॅक्शन चित्रपटात अक्षय सूर्यवंशी नावाचे पात्र साकारताना दिसेल. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रोहित व अक्षयचा ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होणार आहे.

रोहित शेट्टीच्या गतवर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’ या कॉप ड्रामाने बॉक्सआॅफिसवर बक्कळ कमाई केली. ‘सिम्बा’नंतर रोहित शेट्टी ‘सूर्यवंशी’ नावाचा आणखी एक कॉप ड्रामा घेऊन येतोय. रोहितने आपल्या या चित्रपटासाठी अक्षय कुमारला साईन केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच रोहित व अक्षयची जोडी जमणार आहे. ‘सूर्यवंशी’मध्ये अक्षयच्या अपोझिट कोण अभिनेत्री दिसणार, याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता त्याचाही खुलासा झालाय. होय, ‘सूर्यवंशी’मध्ये कतरीना कैफची वर्णी लागली आहे.


अक्षय कुमारने खुद्द कतरीनाच्या नावाची घोषणा केली. इन्स्टाग्रामवर त्याने एक फोटो शेअर केला. अक्षय, कतरीना, रोहित शेट्टी, करण जोहर असे सगळे या फोटोत आहेत. ‘कतरीना तुझे कॉप ड्रामात स्वागत आहेत. ही आमची सूर्यवंशी गर्ल....’, असे हा फोटो शेअर करताना अक्षयने लिहिले आहे.
यापूर्वी अक्षय व कतरीना ही जोडी अनेक चित्रपटांत एकत्र झळकली आहे. हमको दीवाना कर गए, नमस्ते लंडन, वेलकम, सिंह इज किंग, दे दना दन, तीस मारखां असे अनेक चित्रपट दोघांनी एकत्र  काम केले. याचदरम्यान अक्षय व कतरीना यांच्या अफेअरच्या बातम्या झकळू लागल्या. या अफेअरच्या बातम्या वाचून पत्नी टिष्ट्वंकलने म्हणे अक्षयला कतरीनासोबत पुन्हा काम न करण्याची तंबी दिली होती. यानंतर दीर्घकाळ अक्षय कतरीनासोबत कुठल्याही चित्रपटात झळकला नाही. पण आता कदाचित टिष्ट्वंकलचा राग निवळला असावा आणि तिने अक्षयला कॅटसोबत काम करण्याची परवानगी दिली असावी.


या अ‍ॅक्शन चित्रपटात अक्षय सूर्यवंशी नावाचे पात्र साकारताना दिसेल. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रोहित व अक्षयचा ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होणार आहे. तुम्हाला ठाऊक असेलच की, केवळ साऊथमध्येच नाही तर हिंदीतही ‘सूर्यवंशी’नावाचा चित्रपट याआधी बनला आहे. या जुन्या ‘सूर्यवंशी’मध्ये सलमान खान लीड रोलमध्ये होता.

Web Title: confirm katrina kaif to pair opposite akshay kumar in cop drama film sooryanvanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.