Confirm Kareena Kapoor will appear in the remake of the film | कन्फर्म करिना कपूर दिसणार या चित्रपटाच्या रिमेकमध्ये

करिना कपूर खान गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे, शेवटची ती उडता पंजाबमध्ये दिसली होती. हा चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला होता. प्रेग्नेंसी दरम्यान ती चित्रपटातून ब्रेक घेतला होता. मात्र आता ती पुन्हा एकदा चित्रपटात परतते आहे. वर्षापूर्वी करिनाच्या आयुष्यात तैमूरचे आगमन झाले. जन्मापासूनच तैमूरची बॉलिवूड आणि मीडियामध्ये चर्चा असते.  बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात.त्यामुळे तैमूरच्या बाललीला सध्या प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतोय.

सध्या करिना 'वीरे दी वेडिंग'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. करिना कपूरकडे चार चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स आल्या होत्या. त्यातली मराठी चित्रपट 'आपला माणूस'च्या हिंदी रिमेकची स्क्रिप्ट तिला आवडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की ती या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. मात्र आता ते कन्फर्म झाले आहे. आशुतोष गोवारिकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. बाप माणूसची गोष्ट एक वडिल, मुलगा आणि सून ह्याच्या नात्यावर आधारित आहे. सुनेमुळे आपले आणि आपल्या मुलाचे नाते दुरावत चालले आहे असे वडिलांना वाटत असते. 

करिना कपूरचा वीरे डी वेडिंग चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात करिना कपूरसह  सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे.‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे.सोनम कपूरची बहीण रेहा कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत.  

ALSO READ :  ​आई करीनाच्या कुशीत जाण्यासाठी चिमुकल्या तैमूरचा हट्ट, बाललीला कॅमे-यात कैद

Web Title: Confirm Kareena Kapoor will appear in the remake of the film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.