Coen's friend laughs 22 lakhs for friendship; Interest repayment with interest! | कोयना मित्राने मैत्रिणीलाच घातला २२ लाखांना गंडा; व्याजासह करावी लागेल परतफेड!

अभिनेत्री कोयना मित्रा भलेही गेल्या काही काळापासून पडद्यावर बघावयास मिळाली नाही, परंतु कुठल्या ना कुठल्या कारणाने ती नेहमीच चर्चेत असते. आता कोयना तिच्या एका मैत्रिणीने तिच्यावर दाखल केलेल्या एका गुन्ह्यावरून चर्चेत आली आहे. वास्तविक कोयनाकडून २०१६ मध्ये तिच्या मैत्रिणीचा २२ लाख रुपयांचा धनादेश बाउंस झाला होता. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पूनम सेठी असे नाव असलेल्या कोयनाच्या मैत्रिणीने सांगितले की, कोयनाकडे तिची तब्बल २२ लाख रुपयांची उधारी आहे. कोयनाने तिच्याकडून हे पैसे २०१२ ते २०१३ दरम्यान घेतले होते. 

त्यावेळी कोयनाने पूनमला म्हटले होते की, ‘माझी आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे. त्यामुळे तुझ्याकडून मला काही पैसे उसने हवे आहेत. त्यावेळी पूनमने कोयनाला दहा लाख रुपये उसने दिले होते. त्यानंतर कोयनाने वेळोवेळी तिच्याकडून पैसे घेतले. कधी सहा लाख, तीन लाख, तर कधी नऊ लाख रुपये असे मिळून २२ लाख रुपये पूनमकडून घेतले. पुढे पूनमने जेव्हा कोयनाला पैसे मागितले तेव्हा तिने तिला २२ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र हा धनादेश बाउंस झाल्याने दोघींमधील वाद वाढत गेला. 

सुरुवातीला पूनमने २०१३ पर्यंत पैसे मागण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला. परंतु प्रत्येकवेळी पूनम काही ना काही बहाणे सांगून तिला टाळत असे. अखेर पूनमने पोलिसांत धाव घेऊन हे प्रकरण कायदेशीरपणे मिटविण्याचा मार्ग निवडला. त्यामुळे कोयनाच्या अडचणी वाढल्या असून, ती पूनमचे पैसे परत करणार काय हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, कोयना गेल्या काही काळापासून पडद्यावर झळकली नाही. तिच्याकडे एकही प्रोजेक्ट नसल्याने ती सध्या कामाच्या शोधात आहे. अशात कोयना पूनमचे पैसे कसे देणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

दरम्यान, पूनमच्या बाजूने या प्रकरणाचा निकाल लागल्यास कोयनाला व्याजासह परतफेड करावी लागणार आहे. 
Web Title: Coen's friend laughs 22 lakhs for friendship; Interest repayment with interest!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.