Co-abusive abuse! 'Bahubali' actress Scarlett Wilson gave the answer. | ​सहअभिनेत्याने केले गैरवर्तन! ‘बाहुबली’ची अभिनेत्री स्कार्लेट विल्सनने दिले असे उत्तर!!

‘बाहुबली : द बिगीनिंग’चे ‘मनोहारी’ हे गाण आठवतंय. आठवतं असेल तर यातील अभिनेत्री स्कार्लेट मेलिश विल्सन ही सुद्धा आठवत असेल. होय, याच स्कार्लेटशी निगडीत एक बातमी आहे. होय, मुंबईत एका चित्रपटाच्या शूटींगदरम्यान स्कार्लेटसोबत गैरवर्तन झाल्याची बातमी आहे. ‘हंसा - एक संजोग’ या चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडली. या चित्रपटात स्कार्लेट एक आयटम साँग करते आहे. याच गाण्याचे शूट सुरु होते. याच दरम्यान को-स्टार उमाकांत राय याने स्कार्लेटवर आक्षेपार्ह टीप्पणी केली. शिवाय चुकीच्या पद्धतीने स्कार्लेटच्या केसांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मग काय, को-स्टारच्या या वागण्यामुळे स्कार्लेट जाम चिडली अन् तिथेच उमाकांतच्या थोबाडीत दिली. ब्रिटीश मॉडेल व अभिनेत्री असलेल्या स्कार्लेटने गतवर्षी ‘बिग बॉस फेम’ प्रवेश राणासोबत लग्न केले होते. ‘शंघाई’ आणि ‘आर. राजकुमार’ सारख्या चित्रपटांत ती आयटम साँगवर थिरकताना दिसली होती.

चित्रपटाचे निर्माते सुरेश शर्मा यांनी सेटवर घडलेल्या या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. उमाकांतने स्कार्लेटसोबत गैरवर्तन केले. सेटवर अशाप्रकारचे गैरवर्तन कदापि खपवून घेतल्या जाणार नाही. तूर्तास आम्ही उमाकांतला चित्रपटातून काढण्याचा निर्णय घेतला आहे. उमाकांतने स्कार्लेटची जाहिर माफी मागितली आणि स्कार्लेटने त्याला माफ केलेच तर पुढचा निर्णय आम्ही घेऊ. आम्ही फिल्म फेडरेशन आॅफ इंडियाकडेही उमाकांतची तक्रार करणार आहोत, असे ते म्हणाले.

‘हंसा- एक संयोग’ या चित्रपटाची कथा तृतीयपंथीयांच्या आयुष्यावर आधारित आहे. समाजाकडून तृतीयपंथीयांना मिळणा-या वागणुकीवर यात भाष्य करण्यात आले आहे. शरद सक्सेना, श्रेया जी शिंदे, अखिलेन्द्र मिश्रा, अमन वर्मा व दीपशिखा यात प्रमुख भूमिकेत आहेत.
Web Title: Co-abusive abuse! 'Bahubali' actress Scarlett Wilson gave the answer.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.