Closed room, who has kept sex with someone, reveals the scary reality of the shining world, Ekta Kapoor disclosed | बंद खोलीआड कोण कुणासोबत ठेवतं लैंगिक संबंध, झगमगत्या दुनियेचं काळंकुट्ट वास्तव एकता कपूरने केले उघड

डेली सोप क्वीन अशी टीव्ही मालिका आणि चित्रपट निर्माती एकता कपूर हिची ओळख. बेधडक आणि रोखठोक भूमिका मांडण्यामुळे एकता कायम चर्चेत असते. आता बॉलीवुडमध्ये होणा-या लैंगिक शोषणावरही एकता कपूर हिने परखड मत मांडलं आहे. आजवर हिंदी चित्रपटसृष्टीत बंद खोलीआड होणा-या कास्टिंग काऊचची चर्चा होती. अनेक कलाकार आणि मॉडेल्सनी अशाप्रकारचे आरोप केले होते. मात्र यावर केवळ आरोप झाले आणि चर्चा रंगली. आता याच विषयावर एकता कपूर हिने एका कार्यक्रमात तिचे मत मांडले आहे. या क्षेत्रात लैंगिक शोषण होत असलं तरी केवळ निर्मातेच आपल्या पदाचा गैरफायदा घेतात असं नाही, तर कलाकारही काम मिळविण्यासाठी लैंगिक संबंध ठेवण्याची तयारी ठेवतात असं धक्कादायक विधान एकता कपूर हिने केले आहे. "एक निर्माता आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमीच वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतो. केवळ या इंडस्ट्रीमधील शक्तीशाली व्यक्ती त्यांच्या नावाचा गैरवापर करुन नवख्या आणि उद्योन्मुख कलाकारांचा फायदा घेतात असं बोललं जात होतं. मात्र यांत तथ्य नसल्याचे तिने म्हटले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतही हॉलीवुड निर्माते हार्वी वाइन्स्टिनसारखे लोक असून ते पदाचा गैरवापर करुन कलाकारांचा लैंगिक शोषण करतात. मात्र काही कलाकार असे आहेत की जे काम मिळवण्यासाठी स्वतः असे लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तयार होतात असे एकताने या कार्यक्रमात नमूद केले आहे. कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. इथंही नाण्याला दोन बाजू असून केवळ एकाच बाजूची चर्चा होत असल्याचं एकताने म्हटले आहे.काही दिवसांपूर्वी एकता कपूर हिचे वडील आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे अभिनेता जितेंद्र यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या आरोपावरुन हिमाचल प्रदेशमध्ये गुन्हा दाखल झाला होता. 1971 साली जितेंद्र यांनी हॉटेलच्या बंद खोलीत जितेंद्र यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप या महिलेने केला होता. मात्र जितेंद्र यांनी हे आरोप फेटाळले होते. आता वडिलांवरील याच आरोपांचा धागा पकडत एकता कपूर हिने झगमगतच्या दुनियेतील आणखी एक वास्तव जगासमोर आणले आहे. 

Web Title: Closed room, who has kept sex with someone, reveals the scary reality of the shining world, Ekta Kapoor disclosed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.