2.0 Movie: या लिंकवर क्लिक करून तुम्हीही बनू शकता अक्षय कुमारसारखे क्रोमॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 04:54 PM2018-11-28T16:54:25+5:302018-11-28T16:56:35+5:30

'२.०' चित्रपटातील अक्षय कुमारचा क्रोमॅनचा लूक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

By clicking on this link you can become Crowman like Akshay Kumar | 2.0 Movie: या लिंकवर क्लिक करून तुम्हीही बनू शकता अक्षय कुमारसारखे क्रोमॅन

2.0 Movie: या लिंकवर क्लिक करून तुम्हीही बनू शकता अक्षय कुमारसारखे क्रोमॅन

googlenewsNext
ठळक मुद्दे'२.०' सिनेमातील लूकमध्ये तयार होण्यासाठी अक्षयला लागायचे तीन ते चार तास

अक्षय कुमाररजनीकांत यांचा बहुचर्चित चित्रपट '२.०' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत त्यांचे चाहते खूपच उत्सुक आहेत. या सिनेमातील रजनीकांत यांचा लूकची चर्चा होते आहे पण, प्रेक्षक अक्षय कुमारच्या क्रोमॅनवाल्या लूकबाबत जास्त उत्सुक आहेत. त्यामुळे सध्या या लूकची खूप चर्चा होताना दिसते आहे.


'२.०' सिनेमातील अक्षयचा लूक खूप भयावह आहे. त्याला या गेटअपमध्ये तयार होण्यासाठी जवळपास तीन ते चार लागले होते. अक्षयने हा लूक प्रोस्थेटिक मेकअपच्या माध्यमातून केला आहे. मात्र आता कोणालाही हा लूक ट्राय करता येणार आहे. त्यासाठी अक्षय कुमारने त्याच्या फेसबुक व ट्विटर अकाउंटवर एक लिंक शेअर केली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यावर क्रोमॅन लूक बनू शकतो. 
तुम्ही अक्षय कुमारने शेअर केलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर फेसबुक अॅपवर एक नोटिफिकेशन येते. त्या नोटिफिकेशनवर क्लिक केल्यावर फेसबुक कॅमेऱ्याचा सेल्फी मोड अोपन होतो आणि पाहता पाहता चेहऱ्याचा रंग बदलू लागतो व क्रोमॅन लूक बनतो. हा लूक अक्षयच्या चाहत्यांनी ट्राय केला असून ते त्यावर प्रतिक्रिया देखील देत आहेत. 


'२.०' या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय आणि रजनीकांत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबतच अॅमी जॅक्सन, सुधांशू पांडे, आदिल हुसैन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिट ठरेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. शंकर यांचे असून या चित्रपटावर चित्रपटाच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. 

Web Title: By clicking on this link you can become Crowman like Akshay Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.