​या कारणामुळे फराहने चोपले होते चंकी पांडेला, एवढेच नव्हे तर मारून टाकण्याची दिली होती धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 11:08 AM2017-12-15T11:08:07+5:302017-12-15T16:38:07+5:30

फराहने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने केवळ वयाच्या १७ व्या वर्षी फासले या चित्रपटापासून ...

Chunky Pandey was threatened to kill but not only for this reason. | ​या कारणामुळे फराहने चोपले होते चंकी पांडेला, एवढेच नव्हे तर मारून टाकण्याची दिली होती धमकी

​या कारणामुळे फराहने चोपले होते चंकी पांडेला, एवढेच नव्हे तर मारून टाकण्याची दिली होती धमकी

googlenewsNext
ाहने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने केवळ वयाच्या १७ व्या वर्षी फासले या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिची गोविंदा सोबतची जोडी तर प्रचंड हिट झाली होती. फराह ही अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण असून गेल्या १२ वर्षांपासून ती अभिनयापासून दूर आहे. नव्वदीच्या दशकात फराह अभिनयासोबतच अनेकवेळा चुकीच्या कारणांसाठी चर्चेत असायची. फराह ही अतिशय चिडखोर, रागीट होती. कॉन्स्टोव्हर्सींमुळे ती नेहमीच चर्चेत असायची. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अनेकवेळा ती लोकांना शिव्या द्यायची, लोकांवर हात उचलायची. या सगळ्या कारणांमुळे इंडस्ट्रीतील लोक तिला चांगलेच घाबरायचे. 
फराह आणि चंकी पांडे यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. एका चित्रपटाच्या सेटवर फराहने चक्क चंकी पांडेला मारले होते. कमस वर्दी की या चित्रपटात चंकी आणि फराह मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी आय अॅम द मॅन असे म्हणत चंकी फराहकडे पाहून विचित्र इशारे करायचा आणि त्यामुळेच तिने त्याला चांगलाच चोप दिला होता. या घटनेनंतर अक्षरशः चंकी आणि फराह एकमेकांचे दुश्मन बनले होते. या घटनेनंतर काहीच दिवसांत फराहने स्टारडस्ट मासिकाला मुलाखत दिली होती. त्यावेळी फराहला या घटनेविषयी विचारण्यात आले होते. तेव्हा चिडून चंकीला मारून टाकण्याची धमकी फराहने त्या मासिकाच्या मुलाखतीच्या दरम्यानच दिली होती. फराहची ही मुलाखत त्या काळात चांगलीच गाजली होती. 
१९८५ मध्ये फराहने यश चोप्रांच्या फासले या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर फराहने राजेश खन्नांपासून ऋषी कपूर, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, मिथुन, गोविंदा अशा अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले. २००५ मध्ये आलेला शिखर तिचा अखेरचा सिनेमा होता. फराहने अनेक हिट सिनेमे दिले. पण या यशासोबतच एक अपयशाचा काळही तिला पाहावा लागला. यादरम्यान तिने दारा सिंहचा मुलगा विंदू दारा सिंह याच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला. पण हे लग्न काहीच वर्षं टिकले. विंदूसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिने अभिनेता सुमीत सेहगलसोबत लग्न केले. 

Also Read : नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री फराहने या अभिनेत्यासोबत केला दुसरा विवाह

Web Title: Chunky Pandey was threatened to kill but not only for this reason.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.