Chhota Chutu and Chat to eat karina | करिनाला खायचेत छोले भटुरे अन् चाट

 करिना कपूर खान सध्या प्रेगनंन्ट असल्याने तिचे सर्व कोडकौतुक खान कुटुंबीय पुरवत आहेत. त्यामुळे ती प्रचंड खुश आहे. ती म्हणते,‘मी दररोज काही ४ पराठे खात नाही. एक ते दीड पराठे मी खाते.

मला गोबी आणि बटाट्याचे पराठे जास्त आवडतात. माझ्या कुकला माहितीये की, ते मी डिनरला खाते. त्यावर मस्तपैकी भरपूर तूप टाकून मी खाते. त्यामुळे माझे केस आणि त्वचा चांगली होते. सध्या मी माझ्या सिक्स पॅकचा विचार करत नाहीये.

पण, मी जास्त देखील ओव्हरवेट होत नाहीये. प्रेगनंन्ट असणे म्हणजे काही फार खाणे नव्हे. तर योग्य प्रमाणात खाणे, असा त्याचा अर्थ होतो. माझा मुड असेल तर मग मी डेझर्टही खाणे पसंत करते. पण, विकेंडला माझा मुड छोले भटुरे आणि चाट खाण्याचा असतो.’
Web Title: Chhota Chutu and Chat to eat karina
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.