Chhayya Chaiyya, Chalya Chaiyya, was not to sing Malaika Arora but the actress would be seen | ​चल छैय्या छैय्या या गाण्यात मलाइका अरोरा नव्हे तर ही अभिनेत्री झळकणार होती

दिल से या चित्रपटात शाहरुख खान, मनिषा कोईराला यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील या दोघांच्या भूमिका या सगळ्याची तर चर्चा झाली होती. पण त्याचसोबत या चित्रपटातील चल छैय्या छैय्या हे गाणे तर चांगलेच गाजले होते. सुखविंदर सिंगच्या आवाजातील हे गाणे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या गाण्यात प्रेक्षकांना मलाइका अरोराला थिरकताना पाहायला मिळाले होते. या गाण्यातील मलाइकाचे नृत्य सगळ्यांनाच भावले होते. मलाइका एका गाडीच्या छतावर नाचते असे या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटाचे दिग्दर्शक मणी रत्नम यांची या गाण्यासाठी पहिली पसंती ही मलाइका नव्हे तर दुसरी एक अभिनेत्री होती.
शिल्पा शिरोडकरने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. शिल्पा शिरोडकरने नव्वदीच्या दशकात भ्रष्टाचार, योद्धा, हम, आँखे, गोपी किशनसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिल्पा २००० नंतर चित्रपटांपासून दूर होती. पण १३ वर्षांनंतर ती अभिनय क्षेत्राकडे परतली. तिने एक मुठ्ठी आसमान या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने सिलसिला प्यार का या मालिकेत गेल्या वर्षी काम केले. आता ती सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल या मालिकेत काम करत आहे. शिल्पाच्या अभिनयासोबतच तिच्या नृत्याचे नेहमीच कौतुक केले गेले. त्यामुळे तिला दिल से या चित्रपटातील चल छैय्या छैय्या या गाण्यातील नृत्यासाठी विचारण्यात आले होते. तिने या गाण्यासाठी होकार दिला होता आणि तिला साइन देखील करण्यात आले होते. पण केवळ एका कारणामुळे तिला या चित्रपटातूल डच्चू देण्यात आला. 
शिल्पाला या गाण्यासाठी वजन कमी करायला सांगितले होते. पण काही केल्या तिचे वजनच कमी होत नव्हते. त्यामुळे या गाण्यावर शिल्पा ऐवजी मलाइकाला घेण्यात आले. हे गाणे प्रचंड हिट ठरले. आजवरच्या बॉलिवूडमधील हिट साँगमधील ते एक हिट गाणे मानले जाते. 

shilpa shirodkar

Also Read : मुलाच्या वाढदिवशी अशा अंदाजात जिममध्ये पोहोचली मलाइका अरोरा, पहा फोटो!
Web Title: Chhayya Chaiyya, Chalya Chaiyya, was not to sing Malaika Arora but the actress would be seen
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.