चित्रपटातील डायलॉग हटवा अन्यथा बॉम्बने उडवू! मणिरत्नम यांना धमकीचा फोन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 08:46 PM2018-10-02T20:46:34+5:302018-10-02T20:46:52+5:30

भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम यांना आज २ आॅक्टोबरला एका अज्ञात क्रमांकावरून बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. म

chekka chivantha vaanam mani ratnam gets a bomb threat over removal of dialogues | चित्रपटातील डायलॉग हटवा अन्यथा बॉम्बने उडवू! मणिरत्नम यांना धमकीचा फोन!!

चित्रपटातील डायलॉग हटवा अन्यथा बॉम्बने उडवू! मणिरत्नम यांना धमकीचा फोन!!

googlenewsNext

भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम यांना आज २ आॅक्टोबरला एका अज्ञात क्रमांकावरून बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. मणिरत्नम यांचा ‘चिक्का चिवंथा वानम’ हा तामिळ चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटावरून मणिरत्नम यांना धमकीचा कॉल आला. काही लोकांनी मणिरत्नम यांचा या पॉलिटिकल ड्रामातील संवादांवर आक्षेप घेतला आहे.


 प्राप्त माहितीनुसार, मणिरत्नम यांच्या चेन्नईतील आॅफिसात हा धमकीचा कॉल आला. चित्रपटातील डायलॉग हटवा, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ, असे धमकी देणाऱ्याने म्हटले. दरम्यान मणिरत्नम यांनी याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हा कॉल कुठून आला, तूर्तास पोलिस याचा शोध घेत आहेत.
‘चिक्का चिवंथा वानम’ गत शुक्रवारी रिलीज झाला. हा चित्रपट मणिरत्नम यांच्या आत्तापर्यंतच्या सर्वांत हिट चित्रपटांपैकी एक आहे. प्रेक्षकांसोबतच पत्रकारांचाही या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवरचे अनेक विक्रम ध्वस्त केले.

 

Web Title: chekka chivantha vaanam mani ratnam gets a bomb threat over removal of dialogues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.