पतीच्या दिर्घायुष्यासाठी विवाहिता करतात ते व्रत म्हणजे करवा चौथ. रात्री चंद्राचे आणि पतीचे दर्शन घेतल्यानंतर विवाहिता त्यांचे निर्जल व्रत सोडतात.   बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये करवा चौथचे व्रत करणा-या अभिनेत्री आपण पाहिल्यात. आता नजर टाकूया ती, यावर्षी ख-या आयुष्यात पहिला करवा चौथ साजरा करणार असणा-या टीव्ही व बॉलिवूड अभिनेत्रींवर...

बिपाशा बसूबिपाशा बसू आणि करणसिंह ग्रोवर यांचा विवाह सोहळा अप्रतिम असाच राहिला. गत ३० एप्रिला बिप्स व करण विवाह बंधनात अडकले. त्यामुळे यंदाचा करवा चौथ बिपाशाचा पहिला करवा चौथ असणार. आता बंगाली बेब मिसेस ग्रोवर तिच्या मिस्टर राईटला हे व्रत करून किती आणि कशी इंप्रेस करते, ते दिसेलच.

 प्रिती झिंटाअभिनेत्री प्रिती झिंटा ही जेन गुडइनफ याच्यासोबत विवाह बंधनात अडकली. अगदी मोजक्या मित्र व नातेवाईकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. सध्या प्रिती लग्नानंतरचे आयुष्य एन्जॉय करतेय. आता ही ‘इंडियन वाईफ’ तिच्या ‘फॉरेन हबी’साठी करवा चौथचे व्रत ठेवते की नाही, हे जाणून घ्यायला आम्ही उत्सूक आहोत.

 दिव्यंका त्रिपाठीदिव्यंका त्रिपाठी हे छोट्या पडद्यावरील मोठे नाव. याच वर्षी दिव्यंका विवेक दहिया या तिच्या को-स्टारशी लग्नबंधनात अडकली. भोपाळमध्ये गत ८ जुलैला एका  दिव्यंका व विवेक यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे दिव्यंका प्रथमच करवा चौथ करणार. दिव्यंका या व्रतासाठी सुपर एक्साईटेड आहे, हे सांगणे नकोच.

 असिनबॉलिवूड अभिनेत्री असिन व राहुल शर्मा यांचा विवाह सोहळा यंदाचा सगळ्यांत ‘ग्रँड’ सोहळा होता. १९ जानेवारीला हा सोहळा पार पडला होता. आता असिन साऊथ इंडियन आहे, हे आम्हाला माहित आहे. पण  विवाहानंतर धार्मिक मान्यता काहीशा बाजूला ठेवून असिन करवा चौथचे व्रत करूही शकते. तिने हे व्रत ठेवलेच तर तिला लवकरात लवकर चंद्राचे दर्शन होवो, हीच आमची सदिच्छा.

अमृता राव‘विवाह’फेम अभिनेत्री अमृता राव यंदा आरजे अनमोलसोबत विवाह बंधनात अडकली. यंदाचा करवा चौथ अमृताचा पहिला करवा चौथ असणार आहे. आता अमृता हे व्रत कसे साजरे करते, ते बघूच.

Web Title: 'This' celebrity will celebrate his first Karava Chauth!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.