बॉलिवुडमध्ये घटस्फोट न घेताही वेगवेगळे राहाणारे अनेक सेलिब्रेटी आहेत. अनेक वर्षं एकमेकांपासून दूर राहूनही काही कारणास्तव घटस्फोट न घेणाऱे हे आहेत काही सेलिब्रेटी

संगीता बिजलानी -मोहोम्मद अझरुद्दीन
संगीता बिजलानी आणि मोहोम्मद अझरुद्दीन यांचा विवाह १९९६ला झाला. संगीताशी विवाह होण्याआधी मोहोम्मदचे लग्न झाले होते, त्याला दोन मुलेही होती. तर संगीता बिजलानी मोहोम्मदच्या प्रेमात पडण्यापूर्वी सलमान खानसोबत तिचे नाते होते. संगीता आणि मोहोम्मदच्या लग्नाची मीडियात बरीच चर्चा झाली होती. २०१० पासून संगीता आणि मोहोम्मद वेगळे राहात असले तरी अद्याप त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. महिमा चौधरी - बॉबी मुखर्जी
महिमाने बॉबी या आर्किटेकसोबत २००६मध्ये लग्न केले. बॉबी आणि महिमाने २०११मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी अद्याप घटस्फोट घेतलेला नाही. त्यांच्या मुलीसाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जाते.

 

रणधीर कपूर - बबिता
 १९७१ मध्ये रणधीर आणि बबिताचे लग्न झाले. लग्नाच्यावेळी बबिता ही स्टार होती. पण कपूर कुटुंबियातील सुनांनी चित्रपटात काम करू नये अशी राज कपूर यांची इच्छा असल्याने बबिताने इंडस्ट्री सोडावी असे रणधीरने तिला सांगितले. तिथूनच त्यांच्या भांडणांना सुरुवात झाली असे म्हटले जाते. या दोघांना करिश्मा आणि करिना अशा दोन मुली आहेत. रणधीरच्या दारूच्या सवयीमुळे आणि त्याचा रागावर नियंत्रण नसल्याने बबिता १९८८पासून वेगळी राहायला लागली. त्या दोघांनी कधीही घटस्फोट घेतला नाही. घरगुती समारंभ असल्यास ते दोघे आजही एकत्र येतात.

 


राजेश खन्ना - डिम्पल कपाडिया
वयाच्या सोळाव्या वर्षी डिम्पल कपाडियाने सुपरस्टार राजेश खन्नसोबत १९७३मध्ये लग्न केले. राजेश हा त्यावेळी मुलींच्या हृदयावर राज्य करत होता. राजेशने त्याच्यापेक्षा वयाने १५ वर्षांनी लहान असलेल्या डिम्पलसोबत लग्न केले. पण १९८२पासून ते दोघे वेगळे राहायला लागले. पण त्या दोघांनी कधीही घटस्फोट घेतला नाही. राजेशच्या शेवटच्या काळात डिम्पल त्याच्या सोबतच होती.गुलजार - राखी
१९७३मध्ये राखी आणि गुलजार यांचे लग्न झाले. त्याकाळात राखी आणि गुलजार ही दोन्ही बॉलिवुडमधील मोठी नावे होती. गुलजार यांच्या मौसम या चित्रपटात त्यांनी राखीला न घेता शर्मिला टागोरला घेतले असल्याने त्यांच्यात वादाची ठिणगी उडली असे म्हटले जाते. यानंतर लगेचच एका वर्षांत ते दोघे वेगळे झाले. पण आज इतक्या वर्षांनतरंही त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही.रणवीर शौरी -कोंकणा सेन शर्मा 
२००७ साली एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान रणवीर आणि कोंकणा एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर वर्षभरातच ते दोघे एकत्र राहायला लागले. २०१३पासूनच त्यांच्यात भांडणे सुरू असल्याच्या बातम्या येत होत्या. पण २०१५ साली त्यांनी ते वेगळे होत असल्याचे ट्विटरद्वारे घोषित केले. पण त्यांनी अद्यापही घटस्फोटासाठी अर्ज केलेला नाही. 


 


Web Title: Celebrating non-divorced celebrities
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.