Casting Couch: Anurag Kashyap said, 'Friends say, even if the girl refused, do not leave her'! | Casting Couch : अनुराग कश्यपने म्हटले, ‘मित्र म्हणायचे, मुलीने नकार दिला तरी हात सोडायचा नाही’!

बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचविषयी असलेल्या पुरुषी मानसिकतेबद्दल पहिल्यांदाच दिग्दर्शक अनुराग कश्यप याने आपले मत मांडले आहे. अनुरागने म्हटले की, ‘जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझे मित्र म्हणायचे की, मुलीने नकार दिला तरी हात पकडायचा. माझा ड्रायव्हर उत्तर भारतातील आहे. जेव्हा तो एखाद्या महिलेला ड्रायव्हिंग करताना बघतो तेव्हा म्हणतो की, जमत नसेल तर ड्रायव्हिंग करायचीच कशाला. एकूण काय तर पुरुषांच्या मनात हा विचार नेहमीच असतो की, महिलांना आपल्यापेक्षा वरचढ होऊ देऊ नये.’

अनुरागने पुढे बोलताना म्हटले की, ‘आता पहिल्यासारखी स्थिती राहिली नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने अगोदर स्वत:कडे बघायला हवे. हॉलिवूडमध्ये निर्माता हार्वे विंस्टीन याच्यावर ५० पेक्षा अधिक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर संपूर्ण देशात कास्टिंग काउच आणि सेक्शुअल हरॅशमेंट यावर चर्चा केली जात आहे. बॉलिवूडमध्ये सध्या या विषयावर अनेकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. अनुराग कश्यपने म्हटले की, ‘काळ बदलत आहे. शिवाय हे खरोखरच सकारात्मक बाब म्हणावी लागेल की, पीडित स्वत:हून आरोपीविरोधात पुढे येत आहेत. हे प्रकार केवळ एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्येच नाहीत, तर सर्वच क्षेत्रांत आहेत. त्यामुळे आत्मपरीक्षण करून माणूस कसे होता येईल याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. दरम्यान, अनुराग कश्यपच्या या वक्तव्याच्या एक दिवस अगोदरच प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिने कास्टिंग काउचबद्दल प्रतिक्रिया दिली. एकता कपूरने म्हटले की, ‘केवळ निर्माते किंवा पावरफुल लोकच लैंगिक शोषण करीत नाहीत तर, काही अभिनेतेदेखील काम मिळविण्यासाठी सेक्शुअ‍ॅलिटीचा आधार घेतात. याची कोणी वाच्यता करीत नाही, एवढेच!’
Web Title: Casting Couch: Anurag Kashyap said, 'Friends say, even if the girl refused, do not leave her'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.