In the case of singer Papon, there is anger in Bollywood; Raveena Tandon said, 'arrest immediately'! | गायक पापोन किस प्रकरणी बॉलिवूडमध्ये संताप; रविना टंडनने म्हटले, ‘त्वरित अटक करा’!

गायक पापोनच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत. कारण पापोनने केलेल्या कृत्याला आता बॉलिवूडमधूनही विरोध होत आहे. यामध्ये अभिनेत्री रविना टंडन हिचे नाव जोडले गेले असून, तिने स्पष्ट शब्दात पापोनला त्वरित अटक केली जावी, अशी भूमिका मांडली आहे. मायनर कंटेस्टेंटला किस करण्याच्या आरोपात अडकलेल्या पापोनला सातत्याने विरोध होताना दिसत आहे. महाराष्टÑाच्या महिला आणि बालविकास मंत्रालयानेदेखील याप्रकरणी आता ठोस पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. तर रविनाने पापोनला विरोध करण्यासाठी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त  केल्या आहेत. 

रविनाने तिच्या ट्विटमधून स्पष्ट केले की, गायक पापोनला त्वरित अटक केली जावी. तिने लिहिले की, ‘हे खूपच लज्जास्पद आणि घृणास्पद आहे. त्यामुळे पापोनला लवकरात लवकर अटक करायला हवी. यावेळी रविनाने हेदेखील म्हटले की, कंटेस्टेंटच्या आई-वडिलांवर पापोनला वाचविण्यासाठी दबाव टाकला जात आहे. 
 }}}} ">Disgusting! Shameful!Perverse! This man Papon should be arrested ! The girls parents succumbing to pressure ! The explanations given are ridiculous! Haven’t felt such anger and shame to see this happen and some on tv debates actually defending the act !

Disgusting! Shameful!Perverse! This man Papon should be arrested ! The girls parents succumbing to pressure ! The explanations given are ridiculous! Haven’t felt such anger and shame to see this happen and some on tv debates actually defending the act !

— Raveena Tandon (@TandonRaveena)
February 23, 2018}}}} ">— Raveena Tandon (@TandonRaveena) February 23, 2018
यावेळी रविनाने असेही म्हटले की, ‘काही टीव्ही डिबेटमध्ये याप्रकरणी गायक पापोनचा बचाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब खूपच लाजिरवाणी आहे. दरम्यान, गायक शाननेदेखील याप्रकरणी पापोनच्या बाजूने एक ट्विट केले होते. मात्र शानने लगेचच हे ट्विट डिलीट केले. २३ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता पापोनने एक ट्विट करून त्याची बाजू मांडली होती. 
Web Title: In the case of singer Papon, there is anger in Bollywood; Raveena Tandon said, 'arrest immediately'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.