Cannes 2019: प्रियंका चोप्राच्या या लूकचे लेडी डायनाशी काय आहे कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 11:27 AM2019-05-17T11:27:00+5:302019-05-17T11:27:54+5:30

प्रियंका चोप्राने कान्स फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये स्टनिंग डेब्यू केला. रेड कार्पेटवर उतरण्यापूर्वी प्रियंका व्हाईट कलरच्या आऊटफिटमध्ये दिसली. तिचे हे लूक खास होते.

Cannes 2019: priyanka chopra cannes debut in white outfit look inspired by lady diana | Cannes 2019: प्रियंका चोप्राच्या या लूकचे लेडी डायनाशी काय आहे कनेक्शन?

Cannes 2019: प्रियंका चोप्राच्या या लूकचे लेडी डायनाशी काय आहे कनेक्शन?

googlenewsNext
ठळक मुद्देयापूर्वी प्रियंका मेट गालाच्या रेड कार्पेटवर पती निक जोनाससोबत दिसली होती. तिचा हा लूक प्रचंड ड्रामॅटिक होता.

प्रियंका चोप्रानेकान्स फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये स्टनिंग डेब्यू केला. रेड कार्पेटवर उतरण्यापूर्वी प्रियंका व्हाईट कलरच्या आऊटफिटमध्ये दिसली. तिचे हे लूक खास होते. कारण हे लूक लेडी डायनापासून इन्स्पायर होते.
व्हाईट आऊटफिटमधील लूक उघड करण्यापूर्वी प्रियंकाने तिच्या सोशल अकाऊंटवर आयकॉनिक पर्सनॅलिटी लेडी डायनाचा फोटो शेअर केला होता. प्रियंकाचा हा व्हाईट ड्रेस बऱ्याच अंशी लेडी डायनाच्या आऊटफिटशी साम्य साधणारा होता.


लेडी डायनाशिवाय प्रियंकाने सोफिया लॉरेन, प्रिन्सेस मोनाको, ग्रेस कॅली यांचेही फोटो शेअर केले होते. त्यामुळे कान्समधील प्रियंकाचे लूक या आयकॉनशी मिळतेजुळते असेल, असा अंदाज बांधला गेला होता. प्रिन्सेस डायना २६ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांनी प्रिन्स चार्ल्ससोबत कान्स फेस्टिवलमध्ये भाग घेतला होता. यावेळी लेडी डायना यांनी रेड कार्पेटवर कॅथरिन वॉकरने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता.


प्रियंकाने कान्सच्या रेड कार्पेटवर शिमरी ब्लॅक आणि मरून कलरच्या थाई हायस्लिट गाऊनमध्ये एन्ट्री घेतली. प्रियंकाचे हे लूक बरेच सिंपल होते. मोकळे केस, पिंक लिपस्टिक आणि न्यूड मेकअप अशा अवतारात प्रियंका रेड कार्पेटवर उतरली.

या लूकसोबत प्रयोग करणे तिने टाळले. पण तिचा हा लूक चाहत्यांना भावला. काहीच क्षणात कान्समधील रेड कार्पेटवरचे तिचे फोटो व्हायरल झालेत. ते पाहून लोकांनी गॉर्जियस, स्टनिंग, क्वीन आणि ग्लॅमरस असे कमेंट्स दिलेत.


यापूर्वी प्रियंका मेट गालाच्या रेड कार्पेटवर पती निक जोनाससोबत दिसली होती. तिचा हा लूक प्रचंड ड्रामॅटिक होता. यावरून सोशल मीडियावर तिची बरीच खिल्ली उडवली गेली होती.

Web Title: Cannes 2019: priyanka chopra cannes debut in white outfit look inspired by lady diana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.