बॉलिवूडची मस्तानी गर्ल दीपिका पादुकोणने नुकतेच मेट गालामध्ये आपल्या सौंदर्यांने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले होते. आता ती पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज आहे. सध्या मस्तानी गर्ल न्यूयॉर्कमध्ये असून ती कान्स फेस्टिव्हलला हजेरी लावण्यासाठी तिथे गेली आहे आणि त्यासाठी ती जोरदार तयारी करते आहे. कान्समध्ये काय परिधान करावे, यासाठी तिने चाहत्यांकडून सल्ला मागितला आहे.

दीपिका पादुकोणने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. ज्यात तिने आपल्या चाहत्यांना विचारले आहे की तिने रेड कार्पेटवर लाल रंगाचा ड्रेस परिधान करावा की नाही. उद्या कान्स चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटची शोभा वाढविताना अभिनेत्री पहायाल मिळणार आहेत. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील सेलेब्स पहायला मिळणार आहेत.

मेट गाला इव्हेंटमध्ये बार्बी लूकमध्ये दीपिकाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे कान्समधील दीपिकाचा लूक पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.


सध्या दीपिका ‘छपाक’ या चित्रपटात बिझी आहे.  ‘छपाक’ या चित्रपटात ती अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘छपाक’  मधून दीपिका पादुकोण निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. यात विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची भूमिका साकारत आहे. मेघना गुलजार हा चित्रपट दिग्दर्शित करतेय.


याव्यतिरिक्त दीपिका ८३ चित्रपटात रणवीर सिंगसोबत झळकणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देवच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

तसेच या चित्रपटाची सहनिर्मितीदेखील दीपिका करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र अद्याप याबाबत तिच्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 


Web Title: Cannes 2019: Deepika Padukone asks her fans to help with this
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.