Cannes 2018: Bow seen in the Dashing Luc on Cannes's Red Carpet; 'Fakir' promotions made! | Cannes 2018 : कान्सच्या रेड कार्पेटवर डॅशिंग लूकमध्ये दिसला धनुष; ‘फकीर’ला केले प्रमोट!

७१व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन, सोनम कपूर, दीपिका पादुकोण हिच्यासह क्वीन कंगना राणौत यांनी आपल्या सौंदर्याचा जलवा दाखविला. या व्यतिरिक्त अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या ‘मंटो’ या चित्रपटाचे स्क्रीनिंगही कान्समध्ये झाले. तसेच मल्लिका शेरावत, हुमा कुरेशी आणि ‘रईस’ अभिनेत्री माहिरा खान यादेखील कान्समध्ये सहभागी झाल्या होत्या. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे रजनीकांतचा जावाई अभिनेता तथा निर्माता धनुष हादेखील कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर डॅशिंग अंदाजात बघावयास मिळाला. 

आपल्या पहिल्या ‘दि एक्स्ट्राआॅर्डिनरी जर्नी आॅफ द फकीर’ या हॉलिवूड चित्रपटासाठी तो कान्सच्या रेड कार्पेटवर अतिशय हटके अंदाजात दिसून आला. धनुषने गेल्या मंगळवारी चित्रपटाचे दिग्दर्शक केन स्कॉटसोबत त्याचे काही फोटो पोस्ट केले. फोटोमध्ये तो पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाचा सूट परिधान करून दिसत आहे. हा फोटो शेअर करताना धनुषने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कान्स २०१८. दि एक्स्ट्राआॅर्डिनरी जर्नी आॅफ द फकीर... रेड कार्पेट. फकीरचे पुढचे पाऊल पॅरिस असेल. तुमच्याशी लवकरच भेट होईल.’
 
धनुषच्या पत्नीची बहीण आणि निर्माता सौंदर्या रजनीकांत हिने त्याच्या ट्विटला रिट्विट करताना लिहिले की, ‘तो देशाचा गौरव वाढवित आहे. दरम्यान, धनुषचा ‘दि एक्स्ट्राआॅर्डिनरी जर्नी आॅफ द फकीर’ हा एक कॉमेडी इंग्रजी आणि फ्रेंच चित्रपट आहे. रोमेन प्युरटोलस यांच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. धनुषने कान्समध्येच या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले. 
Web Title: Cannes 2018: Bow seen in the Dashing Luc on Cannes's Red Carpet; 'Fakir' promotions made!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.