कान्स २०१८ च्या रेड कार्पेटवर आपल्या पहिल्याच अपीयरेंसनी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने चाहत्यांची मने जिंकली. यावेळी ऐशचा रेड कार्पेटवरील अंदाज बघण्यासारखा होता. शिवाय तिच्यातील आत्मविश्वासही कमालीचा असल्याचे दिसून आले. तिने परिधान केलेल्या निळ्या-जांभळ्या रंगाच्या ड्रेसला शिवण्यासाठी तब्बल तीन हजार तास लागले. या ड्रेसमध्ये ऐशचा फिगर आणखीनच आकर्षक दिसत होता. सोशल मीडियावर तर तिची तुलना चक्क ग्रीक गॉडेसबरोबर केली जात आहे. तिचा हा ड्रेस फुलपाखरांशी प्रेरित आहे. या ड्रेसवर रेशमच्या धाग्यांनी नक्षिकाम केले आहे. याव्यतिरिक्त त्याच्यावर स्वरवोस्की क्रिस्टल्सचाही वापर करण्यात आला आहे. 

दरम्यान, ऐशचा हा ड्रेस आंतररराष्ट्रीय डिझायनर मायकल चिन्को यांनी डिझाइन केला आहे. या ड्रेसची वैशिष्ट्ये सांगताना त्यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ऐशच्या या लूकची चर्चा सध्या आंतरराष्ट्रीय मीडियामध्येही रंगताना दिसत आहे. तिने या सुंदर आउटफिटवर इयरिंग्स आणि अंगठी आदी कॅरी केल्याने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडल्याचे दिसत आहे. 

गेल्यावर्षीदेखील ऐश्वर्याने याच डिझायनरने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर एंट्री केली होती. सिंड्रेलाच्या कथेने प्रेरित या बॉलरूम गाउनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. दरम्यान, ऐश गेल्या काही दिवसांपासून तिच्या इन्स्टाग्राम डेब्यूमुळे चर्चेत आहे. अशात तिचा कान्समधील लूक समोर आल्याने ती आंतरराष्टÑीय मीडियामध्ये चर्चिली जात आहे. 
">http://

Web Title: Cannes 2018: Aishwarya Rai dressed three meter long dress; Aishwarya is astonished!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.