Call me Papa, I have to hug ... Dhoni's daughter is different! Look, video !! | ​पापा को बुलाओ ना, मुझे हग करना है...धोनीच्या मुलीचा वेगळाच हट्ट! पाहा, व्हिडिओ!!

 कॅप्टन कूल महेन्द्र सिंग धोनीची ३ वर्षांची मुलगी जिवा हिचे नाव देशाच्या मोस्ट पॉप्युलर स्टार किड्सच्या यादीत सगळ्यांत वरचे आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. सध्या सुरू असलेल्या आयपीएल सीझनमध्ये तर सोशल मीडियावर जिवाचीच धूम आहे. तिचे फोटो सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. अलीकडे जिवा किंगखान शाहरूख खानसोबत स्टेडियममध्ये मस्ती करताना दिसली होती. आयपीएल सीझनमध्ये जिवा अनेकदा स्टेडियमवर दिसते. तिचे पापा मैदानात चौकार-षट्कार लावत असतात तर इकडे जिवाची धम्माल मस्ती सुरू असते. सध्या जिवाच्या अशाच धम्माल मस्तीचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात जिवा  एक वेगळाच हट्ट धरून बसली आहे.
 


ALSO READ : धोनीच्या मुलीसोबत जमली शाहरुख खानची गट्टी; पाहा दोघांमधील धमालमस्तीचे फोटो!

होय, अलीकडे किंग्स इलेवन पंजाब व चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल सामना रंगला. या सामन्यात धोनी मैदानावर फलंदाजी करत होती. अन् जिवा पापाचा खेळ बघत, मस्ती करत होती. अचानक मैदानावरच्या स्क्रिन्सवर जिवाला पापाचा चेहरा दिसला अन् जिवा एक वेगळाच हट्ट धरून बसली. पापा को बुलाओ ना, पापा को जल्दी बुलाओ ना...मुझे पापा को हग करना है...अशी  विनंती जिवा वारंवार करताना या व्हिडिओत दिसतेय. निश्चितपणे जिवाचा हा अंदाज प्रचंड क्यूट आहे. तिच्या या क्यूट अंदाजाने लोकांना वेड लावले आहे. म्हणूनच हा  गत १८ तासांत २२ लाखांवर लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.धोनीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 
तुम्हीही हा व्हिडिओ पाहा आणि जिवाचा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला नक्की कळवा.
Web Title: Call me Papa, I have to hug ... Dhoni's daughter is different! Look, video !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.