Brothers favorite for fans! Salman Khan's 'Race 4' will also come! | भाईजानच्या चाहत्यांसाठी खूशखबर ! सलमान खानचा ‘रेस4’ही येणार !!

सलमान खानचा कुठलाही चित्रपट रिलीज होवो, रिलीजनंतरचे काही दिवस केवळ तो चित्रपट तेवढाच चर्चेत असतो. सध्याही तेच दिसतेय. तूर्तास केवळ ‘रेस3’ आणि ‘रेस3’चीच तेवढी चर्चा आहे. चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला फारशी दाद दिली नाही. पण तरिही हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर धूम करतोय. केवळ देशातचं नाही तर विदेशातही या चित्रपटाची जादू पाहायला मिळतेय. वर्ल्ड वाईड कलेक्शनच्या आकड्यांवर नजर टाकली तर आत्तापर्यंत चित्रपटाने 200 कोटींचा आकडा पार केला आहे. केवळ चारचं दिवसांत ‘रेस3’ने 210.88 कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. साहजिकचं सल्लू भाईसोबतच सल्लू भाईचे चाहतेही आनंदात आहेत. आता हा आनंद आणखी द्विगुणीत करणारी बातमी आहे. होय, ही बातमी वाचल्यानंतर सलमानच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार राहणार नाही. होय, ही बातमी म्हणज  ‘रेस3’चा चौथा भाग अर्थात ‘रेस4’ सुद्धा  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खरे तर ‘रेस3’च्या शेवटच्या सीनमध्येचं सलमान खान व अनिल कपूर ‘रेस4’ही बनणार असल्याची हिंट देतात. आता चित्रपटाचे निर्माते रमेश तौरानी यांनी यास दुजोरा दिला आहे.


‘रेस4’ही येणार का, असे रमेश तौरानी यांना विचारले गेले. यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. ‘रेस4’ जरूर येणार. पण याला काही वेळ लागेल. आधी स्क्रिप्ट बनणार आणि नंतर सगळे ठरणार. तूर्तास ‘रेस4’बद्दल अद्याप काहीही निर्णय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. ‘रेस4’मध्ये भाईजान असणार का, हेही तौरानी यांनी कन्फर्म केले. ‘रेस4’सलमान खान जरूर असणार/ सलमान नसेल तर कसे होईल, असे ते म्हणाले. 
निश्चितपणे हे ऐकल्यानंतर हे ऐकून सलमानच्या चाहत्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला असणाऱ कारण ‘रेस4’ बनायला वेळ लागणार असला तरी तो बनणार, हीच चाहत्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे.  ‘रेस4’ पाहायला तुम्ही किती उत्सूक आहात, ते आम्हाला जरूर सांगा. खालील कमेंटबॉक्समध्ये तुम्ही आपल्या प्रतिक्रिया लिहू शकता.

ALSO READ :Worst indian actor कोण? गुगल म्हणतो, सलमान खान!!
Web Title: Brothers favorite for fans! Salman Khan's 'Race 4' will also come!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.