हे ‘ब्रोमान्स’ चित्रपट ठरले अविस्मरणीय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 02:35 PM2019-03-19T14:35:06+5:302019-03-19T14:38:30+5:30

रोमान्स शिवाय हिंदी चित्रपटांमध्ये अन्य भावनिक गोष्ट सर्वात जास्त पसंत करण्यात आली असेल तर ती म्हणजे मैत्री होय आणि ही मैत्री जर दोन पुरुषांमधली असेल तर त्याला ब्रोमान्स म्हणतात. आजपर्यंत बॉलिवूडमध्ये मैत्रीवर आधारित अनेक चित्रपट आले आहेत, त्यापैकीच असे काही चित्रपट आहेत त्यातील रोमान्स ऐवजी दर्शकांनी ब्रोमान्सला अधिक पसंती दिली. जाणून घेऊया अशा चित्रपटांबाबत...

 This 'Bromons' film proved unforgettable | हे ‘ब्रोमान्स’ चित्रपट ठरले अविस्मरणीय

हे ‘ब्रोमान्स’ चित्रपट ठरले अविस्मरणीय

googlenewsNext

-रवींद्र मोरे
बॉलिवूड चित्रपटांचा सर्वात जास्त आवडता आशय म्हणजे रोमान्स होय. इश्क, मोहब्बत, प्यार, प्रेम या विषयाचा फॉर्मूला चित्रपटांमध्ये नेहमी हिट आणि सुपरहिट ठरला आहे. रोमान्स शिवाय हिंदी चित्रपटांमध्ये अन्य भावनिक गोष्ट सर्वात जास्त पसंत करण्यात आली असेल तर ती म्हणजे मैत्री होय आणि ही मैत्री जर दोन पुरुषांमधली असेल तर त्याला ब्रोमान्स म्हणतात. विशेष म्हणजे ही मैत्री एक मेकांच्या भावांपेक्षाही मोठी असते. आजपर्यंत बॉलिवूडमध्ये मैत्रीवर आधारित अनेक चित्रपट आले आहेत, त्यापैकीच असे काही चित्रपट आहेत त्यातील रोमान्स ऐवजी दर्शकांनी ब्रोमान्सला अधिक पसंती दिली. जाणून घेऊया अशा चित्रपटांबाबत...

जिंदगी ना मिलेगी दोबारा
हा चित्रपटदेखील एक ब्रोमान्सच चित्रपट आहे. ऋतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल यांनी या चित्रपटात तीन अशा मित्रांची भूमिका साकारली होती, जे दीर्घकाळानंतर एकमेकांना भेटतात आणि सोबतच एका ट्रिपवर जातात. दरम्यान या तिघांची जी मैत्री दाखविण्यात आली आहे, ती या चित्रपटातील रोमान्सपेक्षाही दमदार आहे. हा चित्रपट पाहून बरेच मित्रासोबत ट्रिप्सला जाऊ लागले होते.

दिल चाहता है
२००० मध्ये रिलीज झालेला ‘दिल चाहता है’ हा चित्रपट ब्रोमान्सच्या बाबतीत आयकॉनच म्हटला जाऊ शकतो. सोबत ट्रिपला जाणे, डिस्कोमध्ये गाणे म्हणणे आणि एकमेकांसोबत मजाक मस्ती करणाऱ्या तिन्ही मित्रांना स्क्रीनवर पाहणे खूपच मजेदार होते. आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान या तिन्ही स्टार्सनी मैत्रीची दमदार भूमिका साकारून दर्शकांना एक आठवणीतला चित्रपट दिला. या चित्रपटात तिघे मित्रांची वेगवेगळी लव्ह स्टोरीदेखील होती, मात्र आज देखील दर्शकांना हा चित्रपट रोमान्सऐवजी ब्रोमान्ससाठी स्मरणात आहे.

अंदाज अपना अपना
‘अंदाज अपना अपना’ बॉलिवूडमधील कल्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात ‘प्रेम’ची भूमिका साकारणारा सलमान खान आणि ‘अमर’ची भूमिका साकारणारा आमिर खान या जोडीला दर्शकांनी एवढी पसंती दिली की, हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला. विशेष म्हणजे या चित्रपटातील ‘अमर-प्रेम’ च्या ब्रोमान्सने अभिनेत्र्यांसोबतच्या रोमान्सला पूर्णत: फिके पाडले होते.

हसीना मान जाएगी
९० व्या दशकात रिलीज झालेल्या या चित्रपटातील संजय दत्त आणि गोविंदाच्या जोडीला दर्शकांनी तर डोक्यावर घेतले होते. या दोघांनी जेवढ्या चित्रपटात सोबत काम केले आहे, त्यापैकी ‘हसीना मान जाएगी’ सर्वात उत्कृष्ट म्हटले जाऊ शकते. या चित्रपटातील दोघांचा ब्रोमान्स एवढा दमदार होता की, चित्रपटातील दोघांची लव्ह स्टोरीज फिकी पडू लागली होती.

3 इडियट्स
या चित्रपटात तर खऱ्या मैत्रीची परिभाषा अतिशय उत्कृष्टपणे मांडली आहे. २०१० साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट चेतन भगतच्या फाइव्ह पॉइंट समवन ह्या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानीने केले. या चित्रपटामध्ये आमिर खान, आर. माधवन, शर्मान जोशी यांची मैत्री आजही कुणी विसरले नाही. यात या तिघांव्यतिरिक्त करीना कपूर, बोम्मन इराणी, ओमी वैद्य, मोना सिंग आणि परिक्षीत साहनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

Web Title:  This 'Bromons' film proved unforgettable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.