Breaking was discussed, but Varun Dhawan took the decision | ब्रेकअपच्या चर्चा होत होत्या, मात्र त्यानंतर वरुण धवनने घेतला हा निर्णय

सध्या बॉलिवूडमध्ये चित्रपटापेक्षा स्टारच्या लग्नाच्या बातम्या जास्त ऐकायला मिळत आहे. आधी विराट आणि अनुष्काची लग्नाची बातमी त्यानंतर सध्या  सोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. आता नवीन बातमी अशी की वरूण आणि नताशा सुद्धा लग्न करतायेत. बॉलिवूड अभिनेता वरून धवन आपल्या लाँग टाइम गर्लफ्रेंड बरोबर लग्न करतायेत अशी चर्चा बॉलिवूडमध्ये चालू आहे. अशी बातमी आहे की ही जोडी २०१८च्या मे किंवा जून महिन्यात लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

ही बातमी कितपत खरी आहे याबद्दल अजून काहीही माहिती मिळालेली नाही. वरूण धवन काही वर्षांपासून नताशा दलाल बरोबर रिलेशनशीपमध्ये आहे आणि त्या दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिले आहेत. इतकेच नव्हे तर नताशा वरूणच्या फॅमिली फंक्शनमध्ये सुद्धा आवर्जून उपस्थित असते. काही दिवसांपूर्वी वरूण आणि नताशाच्या ब्रेकअप झाल्याची चर्चा होती आणि त्यांच्या ब्रेकअपचे कारण आलिया भट्ट आहे असे बोलले जात होते पण आता वरून आणि नताशाला एकत्र बघून सगळे काही व्यवस्थित असल्याचे दिसून येते.

सध्या धवन आपल्या चित्रपटाच्या चित्रिकरणात फार व्यस्त आहे. या वर्षी त्याचा 'ऑक्टोबर' चित्रपट एप्रिल मध्ये प्रदर्शित होणार आहे.यात त्याच्यासोबत  बनिता संधू हा नवा चेहरा दिसणार आहे. एनआरआय असलेली बनिता लंडनमध्ये राहते. पंजाबी कुटुंबात जन्मलेली बनिता ११ वर्षांपासून अभिनय करतेय. ‘अक्टूबर’ या  चित्रपटात एक वेगळी आणि हटके कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुजीत यांना  वृत्तपत्रातील एका बातमीवरून या चित्रपटाची कथा सुचली होती. शुजीत सरकार ‘पीकू’ या चित्रपटावर काम करीत असताना अचानक वृत्तपत्रातील एका बातमीने त्यांचे लक्ष वेधले होते. याच बातमीने शुजीत यांना त्यांच्या ‘अक्टूबर’ या चित्रपटासाठी एक आगळीवेगळी कथा दिली. त्यानंतर वरुण अनुष्का शर्मासोबत सुई-धागामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. 

ALSO READ :  ​हे आहे वरुण धवनच्या फिटनेसचे सीक्रेट; तुम्ही करू शकता त्यास फॉलो!
Web Title: Breaking was discussed, but Varun Dhawan took the decision
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.