बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहतायेत असे म्हटले तर वावगे ठरु नये. त्याला कारणही तसेच आहे. सोनम कपूरनंतर आणखीन एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकली आहे तिचे नाव आहे नेहा धुपिया. नेहा धुपियाने अंगद बेदीसोबत लग्न केले आहे. अंगद बेदी हा क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांचा मुलगा आहे. नेहाने ही पंजाबी धर्माच्या रितीरिवाजानुसार लग्न केले आहे.


गेल्या काही दिवसांपासून अंगद बेदी आणि नेहामध्ये काही तरी शिजत असल्याची चर्चा होती. काही महिन्यांपूर्वी दोघे एकत्र लँच डेटवर स्पॉट झाले होते. नेहा व अंगदने आजपर्यंत एकत्र काम केलेले नाही. पण काही कॉमन फ्रेन्ड्सच्या माध्यमातून त्यांची भेट झाल्याचे कळते. अंगद हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत पिंकमध्ये दिसला होता. त्यानंतर आलिया भट्ट आणि शाहरुख खानच्या डिअर जिंदगीमध्ये सुद्धा अंगद होता. 
नेहाचा जन्म 27 ऑगस्ट 1980 साला झाला आहे. नेहाने बॉलिवूडशिवाय तेलुगू आणि मल्याळम चित्रपटात देखील काम केले आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात रंगमंचावरुन केली आहे तसेच Euphoriaच्या म्युझिक व्हिडिओमध्ये सुद्धा ती झळकली होती. सन १९९४ मध्ये ‘मिन्नरम’ या मल्याळम चित्रपटाद्वारे नेहाने आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती. यानंतर २००२ मध्ये तिने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला.यानंतर वर्षभराने ‘कयामत: सिटी अंडर थ्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अलीकडे नेहा ‘हिंदी मीडियम’, ‘तुम्हारी सुलू’, ‘जुली’ आदी चित्रपटांमध्ये दिसली. सध्या एमटीव्हीवर प्रसारित होणाºया ‘रोडिज एक्स्ट्रीम’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती सूत्रधाराच्या भूमिकेत दिसतेय. याशिवाय तिचा टॉक शो नो फिल्टर नेहा चांगलाच गाजतोयं .गेल्या १७ वर्षांपासून नेहा बॉलिवूडमध्ये घट्ट पाय रोवून आहे. 


 
Web Title: Breaking News: After Sonam Kapoor, Bollywood's famous actress gets stuck in marriage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.