Boyfriend's sister also broke Sonakshi Sinha's relationship !! | बॉयफ्रेन्डच्या बहिणीनेही तोडले सोनाक्षी सिन्हासोबतचे नाते!!

कदातिच सोनाक्षी सिन्हा आणि तिचा कथित बॉयफ्रेन्ड बंटी सजदेह या दोघांमधले सगळे काही संपले आहे. असे म्हणण्यामागे कारणही ठोस आहे. अलीकडे बंटीने आपल्या SIQS  इंटरटेनमेंट या नव्या वेंचरची सुरूवात केली. या पार्टीत सोनाक्षी सिन्हा येईल, अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती. पण या ओपनिंग पार्टीत सोनाक्षी दिसलीच नाही. बंटी व त्याची बहीण सीमा या दोघांनी या पार्टीला इंडस्ट्रीतील अनेक जवळच्या मित्रांना बोलवले. पण सूत्रांचे खरे मानाल तर, सोनाक्षीला या पार्टीचे निमंत्रण नव्हते. त्यामुळेच मलायका अरोरा खान, अमृता अरोरा, किम शर्मा, संजय कपूर असे सगळे या पार्टीत दिसले पण सोनाक्षी गायब दिसली.

काही दिवसांपूर्वी सोनाक्षी व बंटीच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते. पण अचानक दोघांच्याही ब्रेकअपची बातमी आली. अर्थात या ब्रेकअपनंतरही सोनाक्षी व बंटीची बहीण सीमा खान यांच्यात सगळे काही आॅल वेल होते. पण कदाचित आता सगळे काही आॅल वेल राहिलेले नाही. तसे असते तर सीमाने निमंत्रितांच्या यादीतून सोनाक्षीला वगळले नसते. कदाचित बंटीप्रमाणेच त्याची बहीणही सोनाक्षीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतेय.

२०१२ पासून सोनाक्षी व बंटीचे नाव जोडले जावू लागले होते. मध्यंतरी दोघेही साखरपुडा करणार, इथपर्यंत बातमी आली होती. बंटी हा सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खानची पत्नी सीमा खानचा भाऊ आहे. बंटीचे यापूर्वी अंबिका चौहानसोबत लग्न झाले होते. सलमान बंटीच्या या लग्नाला हजर होता. पण हे लग्न उणेपुरे चारच वर्षे टिकू शकले. सोनाक्षीपूर्वी बंटीचे नाव अभिनेत्री दीया मिर्झा हिच्यासोबतही जोडले गेले होते. मात्र दीयानेच स्वत: हे नाते तोडल्याचे कळते.

सध्या सोनाक्षीबद्दल बोलायचे तर ती ‘इत्तेफाक’ या चित्रपटात सध्या बिझी आहे. या चित्रपटात ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. फुल सन्स्पेन्स आणि फुल थ्रील अशा या चित्रपटात सिद्धार्थ व सोनाक्षीचा एकदम नवा अवतार पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १९६९ मध्ये आलेल्या राजेश खन्ना यांच्या ‘इत्तेफाक’चा आॅफिशिअल रिमेक आहे. राजेश खन्ना व नंदा यांनी यात मुख्य भूमिका साकारली होती. 

Web Title: Boyfriend's sister also broke Sonakshi Sinha's relationship !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.