BOX OFFICE: Tiger Shroff goes back to Varun Dhawan, learn 'Bargi-2' earnings! | BOX OFFICE : टायगर श्रॉफने वरुण धवनला टाकले मागे, जाणून घ्या ‘बागी-२’ची कमाई!

टायगर श्रॉफ स्टारर ‘बागी-२’ बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करीत आहे. केवळ ११ दिवसांमध्येच टायगरच्या या चित्रपटाने अभिनेता वरुण धवनच्या ‘जुडवा-२’ला मागे टाकले आहे. होय, ‘जुडवा-२’चा लाइफटाइम कलेक्शनचा आकडा पार करताना टायगरने त्याचा समकालीन अभिनेता वरुण धवनला बॉक्स आॅफिसवर पिछाडीवर सोडले आहे. दरम्यान, टायगरच्या ‘बागी-२’ने दुसºया वीकएण्डपर्यंत २२.५० कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारी चित्रपटाने ५.७० कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर शनिवारी (९.३० कोटी) आणि रविवारी (९.५०) कोटींची कमाई करीत १३५.३५ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. 
 

योगायोग म्हणजे हे दोन्ही चित्रपट साजिद नाडियाडवाला यांचे आहेत. दरम्यान, अभिनेता हृतिक रोशनने अगोदरच टायगरला अल्टिमेट अ‍ॅक्शन अभिनेता म्हणून संबोधले होते. तर अक्षयकुमार आणि अनिल कपूरने त्याचे तोंडभरून कौतुक केले होते. दरम्यान, ज्या पद्धतीने टायगरने दम लावला त्यावरून त्याचा हा चित्रपट आणखी कमाई करण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या मते, टायगरचा ‘बागी-२’ दोनशे कोटी रुपयांच्या आसपास मजल मारेल. 
 

दरम्यान, टायगरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड करताना आई-वडिलांसह ‘बागी-२’च्या सहकलाकारांचे आभार मानले. तसेच साजिद नाडियाडवाला याचेही आभार मानत प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे मी भारावून गेल्याचे त्याने म्हटले. सध्या टायगरचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून, त्याचा हा अंदाज चाहत्यांकडून पसंत केला जात आहे. आता टायगरचा चित्रपट बॉक्स आॅफिसवर किती कोटींपर्यंत मजल मारू शकेल, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
Web Title: BOX OFFICE: Tiger Shroff goes back to Varun Dhawan, learn 'Bargi-2' earnings!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.