BOX OFFICE: Strong start of 'Molecule'; So many millions earned on the very first day! | BOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी!

दिग्दर्शक अभिषेक शर्माच्या ‘परमाणू : द स्टोरी आॅफ पोखरण’ने पहिल्याच दिवशी ४.८२ कोटी रूपयांची कमाई करीत, बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे. निर्मितीबरोबरच चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या जॉन अब्राहमने सांगितले की, ‘प्रकाशझोतात नसलेल्या खºया नायकांना समोर आणण्याचा प्रयत्नाला देशभरातील प्रेक्षकांकडून समर्थन मिळत असल्याचा आनंद होत आहे. मला वितरकांकडून आणि प्रदर्शकांकडून फोन येत आहेत. त्यांच्या समर्थनासाठी मी त्यांचा आभारी आहे. हा चित्रपट १९९८ मधील पोखरणमध्ये करण्यात आलेल्या परमाणू परीक्षण चाचणीवर आधारित आहे. 

‘परमाणू : द स्टोरी आॅफ पोखरण’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९८ मध्ये केलेल्या परमाणू परीक्षण चाचणीवर आधारित आहे. चित्रपटात जॉन अब्राहम  व्यतिरिक्त डायना पॅँटी हिची मुख्य भूमिका आहे. ‘परमाणू’ चित्रपटाची शूटिंग साडेतीन महिन्यांतच पूर्ण करण्यात आली. या चित्रपटाला बोमन ईरानी आणि अभिषेक शर्मा यांनी दिग्दर्शित केले आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून, त्यातील पात्र काल्पनिक आहेत. ‘परमाणू’ची कथा ११ आणि १३ मे १९९८ मध्ये पोखरण न्यूक्लियर टेस्टच्या अवती-भोवती फिरताना दिसते. ज्यामध्ये अमेरिकेला चकवा देत भारत एक न्यूक्लियर देश म्हणून समोर आल्याचे दाखविण्यात आले. चित्रपटाचा अभिनेता आणि निर्माता जॉन अब्राहमच्या मते, ‘परमाणु सेना आणि वैज्ञानिकांना माझा सलाम. कारण हे असे लोक आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर भारताला जगाच्या न्यूक्लियर नकाशावर स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
Web Title: BOX OFFICE: Strong start of 'Molecule'; So many millions earned on the very first day!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.