BOX OFFICE: Salman Khan's 'Tiger Jinda Hai' is on the box office for the fourth week! | BOX OFFICE : चौथ्या आठवड्यातही बॉक्स आॅफिसवर सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’चा जोर कायम!!

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट रिलीज होऊन २८ दिवस झाले आहेत. मात्र अशातही चित्रपटाचा बॉक्स आॅफिसवरील दबदबा कायम आहे. ‘टायगर जिंदा है’ने गेल्या चार आठवड्यांमध्ये भारतात तब्बल ३२९.७५ कोटी रूपयांची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात २०६.०४ कोटी, दुसºया आठवड्यात ८५.५१ कोटी, तिसºया आठवड्यात २७.३१ कोटी, तर चौथ्या आठवड्यात १०.८९ कोटी रूपयांची कमाई केली आहे. गेल्या गुरुवारी चित्रपटाने ७८ लाख रूपयांची कमाई करीत बॉक्स आॅफिसवरील दबदबा कायम ठेवला. विशेष म्हणजे या चार आठवड्यांमध्ये अनेक चित्रपट आले अन् गेले. परंतु अशातही सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर दबदबा ठेवून आहे. 

‘टायगर जिंदा है’ने सलमान खानच्या सर्वाधिक कमाई करणाºया ‘बजरंगी भाईजान’ला मागे टाकले आहे. या चित्रपटाने जवळपास ३२० कोटी रूपयांची कमाई केली होती. एकूणच मोठ्या पडद्यावर सध्या सलमान खान जबरदस्त परफॉर्मन्स करताना दिसत आहे, तर छोट्या पडद्यावरही त्याच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. ‘बिग बॉस’ या सर्वाधिक लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोचा एक सर्वोत्कृष्ट होस्ट म्हणून त्याला ओळखले जाते. आता लवकरच तो छोट्या पडद्यावर ‘१० का दम’ हा शो घेऊन येत आहे. 
 
दरम्यान, सलमानच्या ‘टायगर जिंदा है’चा बॉक्स आॅफिसवरील दबदबा पाहता हा चित्रपट बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याच्या ‘पीके’ या चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक करेल असे चित्र दिसत आहे. असे झाल्यास आगामी काळात आमिर खान सलमानला कशी फाइट देणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 
Web Title: BOX OFFICE: Salman Khan's 'Tiger Jinda Hai' is on the box office for the fourth week!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.