Box office: Alia Bhatt's 'Raji' earns so many millions of dollars in two days! | Box Office : आलिया भट्टच्या ‘राजी’ने दोनच दिवसांत कमाविले इतके कोटी!

अभिनेत्री आलिया भट्ट आणि विक्की कौशल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘राजी’ या चित्रपटाने केवळ दोनच दिवसांत बॉक्स आॅफिसवर बक्कळ कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ७.५३ कोटी रुपयांची ओपनिंग करीत या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर दुसºया दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ होत ११.३० कोटी रुपयांचे कलेक्शन केले. आतापर्यंत केवळ दोनच दिवसांत चित्रपटाने १८.८३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

केवळ दोनच दिवसांत चित्रपटाने १५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केल्याने चित्रपट रविवारी किती कोटींचा गल्ला जमविण्यात यश मिळवितो, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, ट्रेड एनालिस्टनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारच्या कलेक्शनचा विचार करून हा चित्रपट ३० कोटींचा आकडा पार करू शकतो. त्याचबरोबर आगामी काळातही चित्रपटाच्या ग्रोथचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी साधारणत: ३५ ते ४० कोटी रुपये इतका खर्च आला आहे. अशात चार ते पाच दिवसांतच चित्रपट निर्मितीचा खर्च वसूल करणार असल्याची शक्यता आहे. 

ALSO READ : आलिया भट्टच्या ‘राजी’ने पहिल्याच दिवशी मारली बाजी; कमाविले इतके कोटी?

दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया आणि विक्कीने कुठलीच कसर सोडली नाही. अशात चित्रपटाच्या कमाईचा जोर पाहता त्यांना मेहनतीचे फळ मिळताना दिसत आहे. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भारत-पाक संबंधावर आधारित आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त महानायक अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा ‘१०२ नॉट आउट’ हा चित्रपटदेखील चांगली कमाई करीत आहे. दुसºया आठवड्यापर्यंत चित्रपटाने ३२.६० कोटी रुपयांची कमाई केली. 
Web Title: Box office: Alia Bhatt's 'Raji' earns so many millions of dollars in two days!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.