व्हिलचेअरवर बसून ट्रॅव्हल करत आहेत बोमन इराणी, ह्या समस्येमुळे आहेत त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 04:49 PM2018-08-22T16:49:36+5:302018-08-22T16:56:13+5:30

बोमन इराणी यांचा सोशल मीडियावर एअरपोर्टवरील फोटो नुकताच वायरल झाला आहे. ज्यात ते व्हिलचेअरवर बसलेले दिसत आहेत. त्यांचे हे फोटो पाहून त्यांचे चाहते हैराण झाले आहेत.

Boman Irani spotted on wheelchair | व्हिलचेअरवर बसून ट्रॅव्हल करत आहेत बोमन इराणी, ह्या समस्येमुळे आहेत त्रस्त

व्हिलचेअरवर बसून ट्रॅव्हल करत आहेत बोमन इराणी, ह्या समस्येमुळे आहेत त्रस्त

googlenewsNext
ठळक मुद्देव्हिलचेअरवर बसून ट्रॅव्हल करत आहेत बोमनबोमन यांना होतोय स्लिप डिस्कचा त्रास

 

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांनी आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडली आहे. बोमन यांनी वयाच्या चाळीसाव्या वर्षी बॉलिवूडमधील करियरला सुरूवात केली होती. नुकताच त्यांचा सोशल मीडियावर एअरपोर्टवरील फोटो वायरल झाले आहेत. ज्यात ते व्हिलचेअरवर बसलेले दिसत आहेत. त्यांचे हे फोटो पाहून त्यांचे चाहते हैराण झाले आहेत. त्यांना काय झाले आहे, अशी विचारणा त्यांच्या चाहत्यांकडून होते आहे. 

बोमन इराणी यांच्या गुडघ्यामध्ये समस्या निर्माण झाली आहे. नुकतेच बोमन यांनी ट्विटरवर फोटो शेअर करीत लिहिले की, हुसैन आणि श्रीनिवास यांचा मी आभारी आहे. हुसैनने हैदराबादवरून येताना माझी मदत केली, त्यामुळे हुसैन यांचा आभारी आहे.




बोमन जेट एअरवेजच्या विमानाने हैदराबादवरून मुंबईत येत होते. बोमन यांनी आपल्या समस्येबाबत सांगितले की, ते स्लिप डिस्कचा त्रास होतो आहे. त्यामुळे त्यांना चालताना खूप त्रास होतो आहे. त्यामुळे सध्या ते व्हिलचेअरचा वापर करीत आहेत. त्यांना काम करायलादेखील त्रास होतो आहे. 
बोमन इराणी यांनी मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमातून चित्रपटसृष्टीतील करियरला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडियट्स, वेलडन अब्बा यांसारख्या सिनेमात काम करून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. बोमन यांना व्हिलचेअरवर पाहून त्यांचे चाहते खूप हैराण झाले आहेत आणि ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करत आहेत.

Web Title: Boman Irani spotted on wheelchair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.