होय, नोएडाची एक सर्वसामान्य मुलगी आता बॉलिवूडची हिरोईन बनणार आहे. आत्तापर्यंत अन्य मुलींप्रमाणे पार्टी करणे,  नोएडाच्या मोठ-मोठ्या मॉलमध्ये फिरणे, कॅफेमध्ये बसणे असेच काहीसे करणा-या नोएडाच्या या मुलीने २०१७ मध्ये मिस टीन युनिव्हर्सचा किताब जिंकला आणि बॉलिवूडची कवाडं तिच्यासाठी खुली झालीत. होय, आता ती लवकरचं बॉलिवूडमध्ये डेब्यू करताना दिसणार आहे. या मुलीचे नाव काय तर सृष्टी कौर.नोएडाच्या सेक्टर ७१ मध्ये राहणारी सृष्टी लवकरच हरीश व्यास दिग्दर्शित ‘मार्कशीट’ या चित्रपटात दिसणार आहे. शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या भ्रष्टाचारावर आधारित असलेल्या या चित्रपटात सृष्टी लीड रोल साकारणार आहे. नोएडाच्या लोटस व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये सृष्टीने शालेय शिक्षण पूर्ण केले.सध्या ती लंडन कॉलेज आॅफ फॅशनमध्ये फॅशनचे शिक्षण घेत आहे. पण अचानक सृष्टीच्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळाले. होय, ध्यानीमनी नसताना तिला बॉलिवूडची आॅफर आली. याबद्दल ती सांगते, बॉलिवूडमध्ये येण्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझी आई एक फॅशन एक्सपोर्टर आहे. त्यामुळे मी कायम फॅशनबद्दल विचार करायचे. याचमुळे मी सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि मिस टीन युनिव्हर्सचा किताब जिंकला. पण चित्रपटात काम करण्याची संधी मला अचानक मिळाली.  साहजिकचं काही तरी नवीन करण्याच्या इराद्याने मी ती स्वीकारली. ‘मार्कशीट’ या चित्रपटात मी दिल्लीतील एका सर्वसामान्य मुलीची भूमिका साकारणार आहे.या चित्रपटातून समाजाला एक संदेश देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे हा चित्रपट स्वीकारून मी आनंदी आहे. तूर्तास तरी माझा संपूर्ण फोकस या चित्रपटावर आहे. यापुढचे मी अद्याप काहीही ठरवलेले नाही, असेही तिने स्पष्ट केले.
Web Title: Bollywood's Noida Girl! Look, photos !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.