सध्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा जोर वाढत असून, क्रिकेटच्या या महासंग्रामात चौकार, षटकारांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार थेट ग्राउंडवरच हजेरी लावून खेळाडूंना चियर-अप करीत असल्याने या खेळाला ग्लॅमर प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे काही दिग्गज कलाकार तर आयपीएल संघाचे मालकही आहेत. मात्र बॉलिवूड सेलिब्रिटींची आयपीएलमध्ये एवढी रूची का? असा प्रश्न अनेकांना पडत असून, त्याचाच उलगडा करणारा हा वृत्तांत...चित्रपटाचे प्रमोशन
राजकारण, क्रिकेट आणि चित्रपट हे सर्वसामान्य भारतीयांच्या अतिशय जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यातही क्रिकेटला आपल्या देशात प्रचंड पसंत केले जाते. मग तो क्रिकेटचा कुठलाही फॉर्मेट असो त्याची व्ह्यूअरशिप प्रचंड असते. याच कारणामुळे बरेचसे कलाकार आयपीएलचे स्टेडिअम गाठून आपल्या चित्रपटाचा प्रचार करतात. सध्या अभिनेता वरुण धवन हे करताना दिसत आहे. त्याच्या आगामी ‘अक्टूबर’ या चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी तो मैदानात हजेरी लावून खेळाडूंना चियर-अप करताना दिसत आहे. रोमान्स
आयपीएल प्रेम व्यक्त करण्याचेही माध्यम ठरताना दिसत आहे. दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी आयपीएलच्या मैदानावरूनच आपल्या अफेअरच्या वृत्तांना हवा दिली. यंंदाच्या सत्रात अभिनेत्री हेजल कीच पती युवराज सिंगला चियर-अप करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून युवराज-हेजलच्या वैवाहिक जीवनात वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा होती. परंतु हेजलने आयपीएलच्या मैदानात हजेरी लावून या चर्चांना पूर्णविराम दिला. त्याचबरोबर एली एवरामही हार्दिक पांड्याला चियर-अप करण्यासाठी आवर्जून मैदानात पोहोचत आहे. अशात दोघांच्या अफेअरला चांगलीच हवा मिळत आहे. बिझनेस
सेलिब्रिटींचे करिअर जुगाराप्रमाणे असते. कारण कधी करिअर संपून जाईल किंवा कधी सुपरस्टारचा टॅग समोर लागेल याचा काही नेम नसतो. त्यामुळेच ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंधित जवळपास सर्वच सेलिब्रिटी चित्रपट आणि टीव्ही शो व्यतिरिक्त साइड बिझनेस करताना दिसतात. सध्या शाहरूख खान, जुही चावला, शिल्पा शेट्टी आणि प्रिती झिंटा यांनी आयपीएलमध्ये गुंतवणूक करून क्रिकेटला बिझनेसचा स्रोत बनविले आहे. क्रिकेट प्रेम
आयपीएल ११च्या मुंबई येथे झालेल्या ओपनिंग सेरेमनीदरम्यान महानायक अमिताभ बच्चन मुलगा अभिषेक बच्चनसोबत मुंबई इंडियन्सचे मनोबल वाढविताना दिसले. वास्तविक हे दोघेही क्रिकेटचे जबरदस्त चाहते आहे. ते नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावर वॉलवर क्रिकेटसह इतर स्पोर्ट्सबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात. अभिषेक तर कबड्डी आणि फुटबॉल संघाचा मालक आहे. ग्लॅमर
आयपीएलमध्ये ग्लॅमरचा तडका लावला जावा म्हणून आयोजक स्वत:च बॉलिवूड कलाकारांना अ‍ॅप्रोच होतात. दरवर्षी ओपनिंग सेरेमनीदरम्यान इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार आपल्या डान्सनी प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. विशेष म्हणजे यासाठी कलाकारांवर मानधनाच्या रूपात कोट्यवधी रूपयांची उधळण केली जाते. यावर्षी अभिनेता हृतिक रोशन, वरुण धवन, प्रभूदेवा, जॅकलीन फर्नांडिस, तमन्ना भाटिया आणि मिका सिंग यांनी हजेरीत आपला जलवा दाखविला. 
Web Title: Bollywood's IPL connection!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.