-रवींद्र मोरे 
लाइमलाइटमध्ये राहायला कुणाला आवडणार नाही, विशेषत: स्टार किड्सना तर याचे मोठे आकर्षण असते. ते नेहमी चर्चेत असतात, आणि त्यांच्यावर मीडियाचीदेखील नजर असतेच. श्रीदेवीच्या दोन्ही मुली शिवाय सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या स्टार किड्सने अजून बॉलिवूड डेब्यू केला नाही तरीही ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. मात्र काही असेही सेलेब्सचे मुले आहेत ज्यांना लाइमलाइट अजिबात पसंत नाही आणि ते मीडियाच्या कॅमेऱ्यापासून लांब राहणेच पसंत करतात. जाणून घेऊया त्या स्टार किड्सबाबत... 
 
Related image

* एलिजा अग्निहोत्री 
 एलिजा अग्निहोत्री ही अभिनेता अतुल अग्निहोत्रीची मुलगी आणि बॉलिवूड दबंग सलमान खानची भाची होय. अतुलने सलमानची बहीण अलविरासोबत लग्न केले होते आणि अलिजे अलविरा आणि अतुलची मोठी मुलगी आहे. अलिजेला कधीही लाइमलाइटमध्ये राहणे आवडत नाही. खूपच कमी वेळेस ती स्टार पार्ट्यांमध्ये दिसते. विशेषत: त्यावेळी ती कुटुंबासमवेत असते.  * जान्हवी मेहता 
 बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री जूही चावलाची मुलगी जान्हवी मेहता ही आपल्या आईप्रमाणेच खूप सुंदर आहे. मात्र ती लाइमलाइटपासून कोसो दूर आहे. ती आपल्या शिक्षणावर जास्त लक्ष कें द्रित करते. जान्हवी आता फक्त १७ वर्षाची असून ती लंडनला शिक्षण घेत आहे. जूहीचा मुलगा अर्जूनदेखील लंडनमध्येच शिक्षण घेत आहे.  * अगस्त्य नंदा 
अगस्त्य नंदा ही बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता नंदाची मुलगी आहे. श्वेताची मोठी मुलगी नव्या नवेली नंदा तर नेहमी बातम्यांमध्ये असते, मात्र अगस्त्य नंदा क्वचितच फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत आपण पाहिले असेल. तिलाही जास्त चर्चेत राहणे आवडत नाही.  

Related image

* यशवर्धन 
गोविंदाची मुलगी नर्मदा उर्फ टीना आहुजाला आपण ओळखतोच जिने बॉलिवूड डेब्यूही केला आहे. मात्र आपण कदाचित गोविंदाचा मुलगा यशवर्धनला ओळखत नसाल, कारण तो लाइमलाइटपासून कोसो दूर आहे. यशवर्धन हा लंडनमध्येच लहानापासून मोठा झाला आहे. त्यामुळे त्याला ओळखणे कठीण होते. शिवाय तो पार्ट्या आणि मीडियापासून लांबच राहतो.  

Image result for pratanul bahal with mohnish bahal

* प्रनूतन बहल 
प्रनूतन बहल ही बॉलिवूडचा प्रसिद्ध विलेन मोहनीश बहलची मुलगी आणि दिग्गज अभिनेत्री नूतनची नात होय. प्रतूनल ही आपली आजी नूतनसारखीच दिसते. प्रतूनललाही लाइमलाइटमध्ये राहायला आवडत नाही. ती मीडियाच्या समोर कधीच येत नाही. तिला क्वचितच पार्ट्यांमध्ये बघितले गेले आहे. 

Also Read : Bollywood : ‘या’ दिग्गज स्टार्सनी घरच्यांच्या विरोधात जाऊन केली बॉलिवूड एन्ट्री ! 
Web Title: Bollywood: 'These' are from Star Kids Limelight ...!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.