माही गिलच नव्हे तर ‘या’ स्टार्सवरदेखील झाला आहे जीवघेणा हल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 12:40 PM2019-06-21T12:40:15+5:302019-06-21T12:43:11+5:30

माही गिल बुधवारी एकता कपूरची वेब सीरिज ‘फिक्सर’ चा क्लायमेक्स शूट करत होती. या दरम्यान काही लोकांनी क्रू मेंबर आणि माही गिलवर हल्ला केला. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मारामारी झाली, या हल्लेखोरांच्या हल्ल्यात प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष थुंडियल हे जास्त जखमी झाले. हल्ला करणाऱ्या लोकांनी सांगितले की, हे लोकेशन आमचे आहे. तर क्रू चे म्हणणे आहे की, आम्ही परवानगी घेतली असून त्यासाठी पैसेही दिले आहेत. या अगोदरही काही स्टार्सवर असे हल्ले झाले असून त्यांच्याबाबत जाणून घेऊया...

bollywood stars attack by people | माही गिलच नव्हे तर ‘या’ स्टार्सवरदेखील झाला आहे जीवघेणा हल्ला!

माही गिलच नव्हे तर ‘या’ स्टार्सवरदेखील झाला आहे जीवघेणा हल्ला!

googlenewsNext

-रवींद्र मोरे
माही गिल बुधवारी एकता कपूरची वेब सीरिज ‘फिक्सर’ चा क्लायमेक्स शूट करत होती. या दरम्यान काही लोकांनी क्रू मेंबर आणि माही गिलवर हल्ला केला. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मारामारी झाली, या हल्लेखोरांच्या हल्ल्यात प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष थुंडियल हे जास्त जखमी झाले. हल्ला करणाऱ्या लोकांनी सांगितले की, हे लोकेशन आमचे आहे. तर क्रू चे म्हणणे आहे की, आम्ही परवानगी घेतली असून त्यासाठी पैसेही दिले आहेत. या अगोदरही काही स्टार्सवर असे हल्ले झाले असून त्यांच्याबाबत जाणून घेऊया...

* संजय लीला भंसाली


‘पद्मावत’ शूटिंगदरम्यान करणी सेनेने संजय लीला भंसालीचा मोठा विरोध केला होता. त्यांनी भंसालीवर इतिहासासोबत छेडछाड करण्याचा आरोप लावला होता. जेव्हा भंसालीच्या या चित्रपटाची शूटिंग जयपुरमध्ये सुरु होती तेव्हा करणी सेनेच्या समर्थकांनी येऊन सेटची नासधुस केली होती आणि त्यांनी भंसालीला मारहाणही केली होती. या हल्ल्याविरोधात बॉलिवूडनेही आवाज उठविला होता.

* रूपाली गांगुली


प्रसिद्ध टीव्ही अ‍ॅक्ट्रेस रूपाली गांगुलीवर मुंबईच्या वर्साेवामध्ये काही लोकांनी हल्ला केला होता. ती आपल्या कारने तिच्या मुलाला शाळेत सोडायला जात होती. तेव्हा रस्त्यात तिला काही लोकांनी घेरले आणि तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रूपाली गंभीर जखमी झाली होती. हल्ल्यानंतर काही वेळात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आणि त्यांच्या विरोधात कारवाई केली होती.

* गौहर खान


एका रिअ‍ॅलिटी शो मध्ये गौहर खानला एकाने कानशिलात मारली होती. गौहर त्या रिअ‍ॅलिटी शोला होस्ट करत होती. तो इसम प्रेक्षकांमध्ये बसला होता. हल्ला करण्याऱ्या या प्रेक्षकाने गौहर खानला धमकी दिली होती की, एक मुस्लिम महिला असून तू एवढे तोकडे कपडे परिधान का करतेस? तो इसम २४ वर्षीय मोहम्मद अकील मलिक होता आणि त्याला त्यानंतर पोलिसांनी अटक केली होती.

* नवाजुद्दीन सिद्दीकी


नवाजुद्दीन सिद्दीकी कानपुरमध्ये त्याचा अपकमिंग चित्रपट ‘रात अकेली’ ची शूटिंग करत होता. तेव्हा एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आला आणि त्याची मान पकडली. त्याने मान पकडून नवाजला आपल्याकडे खेचले. चाहत्याच्या अशा वागण्याने नवाज चकित झाला. त्यानंतर नवाजच्या बॉडीगार्डने त्या इसमाला तात्काळ पकडले. विशेष म्हणजे या घटनेनंतर नवाजचा हात फ्रॅक्चर झाला होता.

Web Title: bollywood stars attack by people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.