Bollywood stars are coming to the TV, then why do not I ?? | ​बॉलिवूडचे स्टार टीव्हीवर येत आहेत, मग मी का नाही??

रूपाली मुधोळकर

‘आशिक बनाया आपने’ फेम मिस इंडिया तनुश्री दत्ता हिची लहान बहीण इशिता
दत्ताने दाक्षिणात्य चित्रपटांपासून अ‍ॅक्टिंगला सुरुवात केली. यानंतर ‘एक घर बनाऊंगा’मधून तिने छोट्या पडद्यावर डेब्यू केले आणि यानंतर ‘दृश्यम’मधून तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. या चित्रपटात इशिताने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाल्यानंतर इशिताने नव्या चित्रपटाची प्रतीक्षा न करता पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. ‘रिश्तो का सौदागर-बाजीगर’ या  मालिकेत इशिता लीड रोलमध्ये आहे. इशिता दत्ताची बहीण अशी ओळख घेऊन आलेल्या इशिताने आज स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिच्या या प्रवासाबद्दल तिच्याशी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा.. 

 प्रश्न : इशिता, तू आधी तेलगू फिल्ममधून अ‍ॅक्टिंगचा प्रवास सुरु केला. मग तुला बॉलिवूडची लॉटरीही लागली. अशात बॉलिवूडमध्ये दुसरी संधी न शोधता पुन्हा छोट्या पडद्याकडे वळण्याचा निर्णय कसा काय घेतला? 
इशिता : मी तेलगू चित्रपटापासून माझे करिअर सुरु केले. मग टीव्हीवर दिसले. त्यानंतर पुन्हा साऊथची एक फिल्म केली. यानंतर मला ‘दृश्यम’मध्ये संधी मिळाली. आता मी पुन्हा ‘सपनों का सौदागर: बाजीगर’मधून दिसतेय. खरे तर मी माझ्या आयुष्यात काहीही ठरवून केलेले नाही. चांगल्या टीमसोबत चांगले काम एवढेच मी बघते आणि त्यानुसार निर्णय घेतले. मी ‘दृश्यम’नंतर नवी मालिका स्वीकारली, कारण मला त्यातील माझी भूमिका मनापासून आवडली. मी नशीबावर विश्वास ठेवणारी मुलगी आहे. नशीबात जे लिहिलयं, ते घडणारच..वाट्याला येईल ते मी करते. बस्स!! 

प्रश्न : टीव्हीवरून बॉलिवूडमध्ये जाताना एक वेगळा आनंद असतो. बॉलिवूडमधून टीव्हीवर परततांना नेमक्या काय भावना होत्या?
इशिता : मी लहान पडदा- मोठा पडदा असा भेद मानत नाही. किंबहुना आता टीव्ही अधिक सक्षम माध्यम बनले आहे. मोठ मोठे कलाकार आज टीव्हीवर काम करताना दिसत आहे. मग मी का नाही? ‘दृश्यम’नंतर टीव्ही करणार का, असा प्रश्न मला अनेकदा विचार गेला. माझे उत्तर मात्र एकच आहे. माझ्यासाठी प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे. माध्यम नाही. टीव्ही, चित्रपट, प्रादेशिक सिनेमा, वेब सीरिज, थिएटर हे सगळं करायला मला आवडेल. वेगवेगळ्या माध्यमांत काम करण्याची वेगळी मजा असते. मी ती अनुभवते.

प्रश्न : नवी मालिका का करावीशी वाटली? 
उत्तर : मी वत्सल सेठ याच्यासोबत स्क्रीन टेस्टसाठी गेले होते. तोपर्यंत वत्सलची निवड झालेली होती. पण स्क्रिन टेस्ट दिल्यानंतरही मला काहीच कळवण्यात आले नव्हते. पण शूटींग सुरु होण्याच्या दोन दिवसांआधी मला फोन आला. अर्थात मालिकेचे कथानक व टीमकडे पाहून मी होकार दिला. 

प्रश्न : यात तुझी भूमिका काय आहे? 
उत्तर : मी यात अरूंधती बनलीय. ती एक साधी सरळ, संवेदनशील मुलगी आहे. ही भूमिका मला साजेशीच आहे. कारण मीही अशीच आहे. साधी-सरळ, जमिनीवर पाय असलेली. त्यामुळेच ही भूमिका मला भावली.  

प्रश्न : तनुश्री तुझी मोठी बहीण. ती तुला कशी मार्गदर्शन करते?
इशिता : मला कायम तिचे पाठबळ मिळत आले आहे. ती नेहमी मला मार्गदर्शन करते. कठीण श्रमाशिवाय पर्याय नाही. यश मिळवायचे तर प्रयत्नांची पराकाष्ठा हेच ती मला सांगत आलीय. आज मी अभिनय क्षेत्रात आहे, याचे सगळे क्रेडिट तिलाच जाते. मी जितकी स्वत:ला ओळखत नाही, तितकी ती मला ओळखते. 

प्रश्न : भविष्यात स्वत:ला तू कुठे पाहतेय? काही लक्ष्य?
इशिता : मला एक सशक्त अभिनेत्री बनायचे आहे आणि त्याशिवाय आनंदी राहणे, हेच माझे लक्ष्य आहे.

प्रश्न : नवे काही प्रोजेक्ट?  
इशिता : नुकतीच माझी एक वेब सीरिज येऊन गेलीय. सध्या मी केवळ याच मालिकेवर लक्ष केंद्रीत केलेय. तसेही मालिकेत मुख्य भूमिकेत असाल तर अन्य दुसºया कामासाठी वेळ काढणे फार कठीण असते. 
Web Title: Bollywood stars are coming to the TV, then why do not I ??
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.