बॉलिवूडमध्ये अनेक नवे चेहरे येत आहेत. या नव्या चेहºयांच्या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे. होय, हे नाव आहे संजना सांघी हिचे. संजना सांघी लवकरच लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतेयं. 
आपल्या पहिल्याच ‘सोलो लीड’ चित्रपटात सुशांत सिंग राजपूतसोबत काम करण्याची संधी संजनाला मिळाली आहे. ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ या २०१४ मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. यात सुशांत व संजनाची जोडी एकत्र दिसणार आहे. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा या चित्रपटाद्वारे डायरेक्टर डेब्यू करत आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी संजनाची निवड केली आहे.  अर्थात हा संजनाचा पहिला चित्रपट नाही. कारण ‘रॉकस्टार’ या चित्रपटात संजनाने नरगिसच्या बहीणीची भूमिका साकारली होती. अलीकडे आलेल्या ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटातही ती दिसली होती. पण हिरोईन म्हणून हा संजनाचा पहिला चित्रपटचं म्हणता येईल. दिल्लीत राहणारी संजना यापूर्वी अनेक जाहिरातीतही दिसली आहे.संजनाबद्दल मुकेश छाबडा यांनी सांगितले की, मी ‘रॉकस्टार’च्या कास्टिंगदरम्यान संजनाला भेटलो होतो. त्याक्षणीचं मला तिच्यातील ऊर्जा जाणवली होती. पुढे अनेक वर्षांनंतर एका जाहिरातीच्या निमित्ताने आम्ही भेटलो. या वेळी ती आणखीच प्रगल्भ झालेली मला दिसली. तिचा अभिनय आणखी प्रगल्भ झाला होता. हिच्यासोबत एकदिवस नक्की चित्रपट बनवेल, हे मी त्याचक्षणी ठरवले होते आणि अखेर तो एकदिवस आला. ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ची स्क्रिप्ट तयार होती आणि या स्क्रिप्टमध्ये संजना अगदी फिट बसत होती.  आधी या चित्रपटासाठी वरूण धवन व दीपिका पादुकोण यांच्या नावाची चर्चा होती. पण ही बातमी निव्वळ अफवा निघाली. आता या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि संजनाची वर्णी लागली आहे. या फ्रेश जोडीचा आॅनस्क्रीन रोमान्स पाहणे निश्चितपणे कमालीचे इंटरेस्टिंग असणार आहे.
Web Title: Bollywood gets another heroine! Name of Sanjana Sanghi !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.