चोरी चोरी चुपके चुपके प्रेमप्रकरण सुरु असणारे हे बॉलीवुड कपल, सलमान -शाहरूखचाही होता समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 05:23 PM2019-02-08T17:23:12+5:302019-02-08T17:35:58+5:30

कुठेही चर्चा होऊ नये याची खबरदारी घेत प्यार किया तो डरना क्या म्हणत बॉलिवूडचे हे कपल खुल्लम खुल्लम खुल्ला प्रेम करताना स्पॉट झाले.

Bollywood Couple Who Caught While Romance Include Salman Shahrukh khan | चोरी चोरी चुपके चुपके प्रेमप्रकरण सुरु असणारे हे बॉलीवुड कपल, सलमान -शाहरूखचाही होता समावेश

चोरी चोरी चुपके चुपके प्रेमप्रकरण सुरु असणारे हे बॉलीवुड कपल, सलमान -शाहरूखचाही होता समावेश

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये नाती हे कधी बदलतील कोणाशी कोणाचे सुच जुळेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे दरवेळी लिंक अपल -ब्रेकअपच्या बातम्या या कानावर पडतातच. बॉलिवूडमध्ये कुणी दिली जादू की झप्पी... तर कुणाला प्रेमाची स्वीट पप्पी..शा त-ेहने
 चोरी चोरी चुपके चुपके प्रेमप्रकरण सुरु असल्याचे अनेक उदाहरणं आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करणारे हे सेलिब्रेटी अचानक खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो म्हणत वेऴोवेळी स्पॉट झाले यांत सगळ्यात आधी नाव येेते ते अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि सनी देओल यांचे. अक्षय कुमारची सासूबाई डिम्पल कपाडिया आणि अभिनेता सनी देओल या दोघांच्या एका  फोटोने इंटरनेटवर चांगलीच आग लावली  होती. लंडनच्या रस्त्यावर टीपलेल्या फोटोत डिम्पल आणि सनी दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन बसल्याचे फोटोत पाहायला मिळाले होते.  सा-या जगापासून दूर आणि कोणालाही जराही कुणकुण लागू न देता गुपचुप गुपचुप दोन दिल एकत्र आले होते. त्याची कुठेही चर्चा होऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतली होती.

असंच काहीसं खुल्लम खुल्ला प्रेम करताना बॉलिवूडचे आणखी एक हॉट कपल होते चर्चेत. ते  कपल म्हणजे रणबीर आणि कॅटरिना.  लॉस एन्जेलिसच्या रस्त्यावर कॅट रणबीरचा हात पकडून न्यू इयर सेलिब्रेट करताना दिसली होती.

आणखी एक बॉलिवूडचं कपल जे वारंवार आपल्या प्रेमाची अप्रत्यक्ष कबूली देताना दिसले ते म्हणजे दिल तो पागल है म्हणत रोमान्सचा बादशहा किंग खान शाहरुखचं हृदय 'डॉन-2' च्या वेळी पिग्गी चॉप्सवर फिदा झालं होतं...एका पुरस्कार सोहळ्यात शाहरूखनं सा-यांसमोर पिग्गी चॉप्सला किस केले होते.

सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी बॉलिवूडमधली हॉट सिझलिंग जोडी आहे. सध्या या लव्हबर्डसची सगळीकडे चर्चा आहे. अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर त्यांचा रोमान्स सुरु झाला. यानंतर प्रत्येक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात येते. प्यार किया तो डरना क्या म्हणत हे कपल खुल्लम खुल्लम खुल्ला प्रेम करत अधुन-मधून चर्चेत येत असतात.

Web Title: Bollywood Couple Who Caught While Romance Include Salman Shahrukh khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.