This Bollywood actress was at a young age ... married for a few months | ​या बॉलिवूड अभिनेत्रीचे लहान वयात झाले होते लग्न... काहीच महिन्यात दिला होता नवऱ्याला घटस्फोट

माही गिल ही मुळची चंडीगढची असून तिने पंजाबी चित्रपटापासूनच तिच्या करियरला सुरुवात केली आहे. माहीने हवाएं या पंजाबी चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिच्या पंजाबी चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर ती बॉलिवूडकडे वळली. तिने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. माही तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. खोया खोया चांद या चित्रपटापासून तिने बॉलिवूडमधील तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर देवडी या चित्रपटात ती झळकली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटानंतर तिने दबंग, साहेब बिवी और गँगस्टर, पान सिंग तोमर, दबंग २ यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. तिने आजवर तिच्या अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड दृश्य दिली आहेत. त्यामुळे माही नेहमीच या गोष्टीसाठी चर्चेत असते. पण त्याचसोबत माहीचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असतं. तुम्हाला माहीत आहे का, माहीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच तिचे लग्न होऊन तिचा घटस्फोट देखील झाला होता. माहीनेच तिच्या एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. माहीने दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, माझे पहिले लग्न खूपच लवकर झाले होते. त्यावेळी माझे वय खूपच लहान असल्याने मी मॅच्युअर्ड देखील नव्हते. त्यामुळेच बहुधा आमचे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि आम्ही वेगळे झालो. 

mahi gill


बॉलिवूडमध्ये येण्याआधी अनेक कलाकार आपले नाव बदलतात. त्याचप्रमाणे माही गिलने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आपले नाव बदलले. माहीचे खरे नाव रिम्पी गिल कौर असे असून ती अभ्यासात खूप खूशार होती. माहीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी अनुराग कश्यपच्या देवडी या चित्रपटातील भूमिकेसाठी तिचे विशेष कौतुक केले जाते. अभिनयासोबतच माहीने निर्मिती क्षेत्रातही आपले भाग्य आजमावले आहे. आतिषवाजी इश्क या पंजाबी चित्रपटाची तिने निर्मिती केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Also Read : ​‘आॅरफन ट्रेन’मध्ये माही गिल
 
Web Title: This Bollywood actress was at a young age ... married for a few months
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.