बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री लहानपणीही दिसायची तितकीच क्यूट..ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 03:57 PM2018-07-19T15:57:46+5:302018-07-19T16:11:42+5:30

बॉलिवूडचे कलाकार सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असतात. अजय देवगणच्या अभिनेत्रीने देखील तिच्या बालपणचा फोटो शेअर केला आहे.

This Bollywood actress was beautiful from her childhood, guess who is she? | बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री लहानपणीही दिसायची तितकीच क्यूट..ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री

बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री लहानपणीही दिसायची तितकीच क्यूट..ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री

googlenewsNext
ठळक मुद्देइलियान काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'रेड' सिनेमात अजय देवगणसोबत दिसली होती रेड आधी 'बादशाहो'मध्ये तिने अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर केली होती

बॉलिवूडचे कलाकार सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असतात. अजय देवगणची अभिनेत्री इलियाना डिक्रूझने आपल्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने कॅप्शनदेखील दिले आहे, अजून ही खूप काही बदलेल नाही.  


इलियान काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'रेड' सिनेमात अजय देवगणसोबत दिसली होती. ‘रेड’ हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित आहे. १९८१ मधील देशातील सर्वात मोठा हायप्रोफाईल आयकर धाडीचे कनेक्शन यात दाखवले आहे. रेड आधी 'बादशाहो'मध्ये तिने अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर केली होती. अजय देवगणसोबत इलियानाची ‘बादशाहो’मध्ये चांगलीच केमिस्ट्री बघावयास मिळाली होती.


काही महिन्यांपूर्वी इलियाना कास्टिंग काउचवर बोलली होती.  बॉम्बे टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार इलियानाने म्हटले की, ‘होय, ही गोष्ट ऐकायला थोडीशी विचित्र वाटते. परंतु मी याविषयी पूर्णपणे सहमत आहे की, जो कोणी कास्टिंग काउचबद्दल बोलते त्याचे करिअर संपून जाते. काही वर्षांपूर्वी साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एका ज्युनियर आर्टिस्टने मला विचारले होते की, या सर्व गोष्टी कशापद्धतीने डिल केल्या जातात? तेव्हा मी तिला सांगितले होते की, हे मी तुला सांगू शकत नाही. याबाबतचा निर्णय सर्वस्वी तुझा आहे. कोणीही यासाठी तुझ्यावर दबाव आणू शकत नाही. बऱ्याचशा लोकांनी असे केले असून, ते सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून होते की, त्यांनी काय करायला हवे. लैंगिक शोषणाबद्दल सांगायचे झाल्यास मी याचे कधीच समर्थन करीत नाही,’ असेही इलियानाने सांगितले. 

Web Title: This Bollywood actress was beautiful from her childhood, guess who is she?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.