Bollywood actress Rishabh Pant took a shot; Wrote 'ha' message! | बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री ऋषभ पंतच्या फलंदाजीवर झाली फिदा; लिहिला ‘हा’ संदेश!

बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्यातील नाते काही औरच आहे. दोन्ही क्षेत्रांतील ग्लॅमर असे काही आहे की, अन्य क्षेत्रांत कदाचितच बघावयास मिळेल. त्यामुळेच जेव्हा-जेव्हा एखादी अभिनेत्री क्रिकेटपटूचे कौतुक करताना दिसली की, लगेचच त्यांच्यातील अफेयरवरून जोरदार चर्चाही रंगते. काहीसे असेच पुन्हा एकदा बघावयास मिळत आहे. एका बॉलिवूड अभिनेत्रीने आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेविल्सकडून खेळणाºया विस्फोटक फलंदाज ऋषभ पंत याच्याविषयी कौतुकाचे इमले बांधले. या सीजनमध्ये ऋषभचा जबरदस्त परफॉर्मन्स बघावयास मिळाला. आपल्या विस्फोटक फलंदाजीमुळे त्याने सध्या आॅरेंज कॅप आपल्या नावे ेकेली आहे. 

दरम्यान, ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यासारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे करणाºया अभिनेत्री नुसरत भरूचा हिने ऋषभच्या बॅटिंगचे तोंडभरून कौतुक केले. तिने तिच्या आॅफिशियल ट्विटर अकाउंटवर लिहिले की, ‘६३ चेंडूमध्ये १२८ धावा, ऋषभ पंत... जबरदस्त खेळ, बघून मजा आली. केवळ त्याची इनिंग बघण्यासाठी मी हायलाइट्स पुन्हा बघितले. नुसरत भरूचाने हे ट्विट ११ मे रोजी केले होते. या ट्विटनंतर ऋषभनेदेखील त्यास रिट्विट करीत स्माइलची इमोजीसह थॅँक्यू असे लिहिले. 
 }}}} ">128 off 63!! @RishabPant777 what a game!! Absolute delight to watch! Saw the highlights just to see his innings again!

— Nushrat Bharucha (@NushratBharucha) May 10, 2018
दरम्यान, नुसरत भरूचा हिचा ‘सोनू के टीटू की स्वीटी’ हा चित्रपट गेल्या फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. दरम्यान, आयपीएलमध्ये ऋषभची बॅटिंग चांगलीच बहरताना दिसत आहे. आतापर्यंत त्याने गोलंंदाजांची यथेच्छ धुलाई केल्याचे दिसून आले. त्यामुळे लवकरच त्याची वर्णी भारतीय क्रिकेट संघात लागण्याची शक्यता आहे. नुसरतने २०१० मध्ये बॉलिवूडमध्ये ‘लव सेक्स और धोखा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. परंतु तिला खरी ओळख ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाच्या सिरीजमधून मिळाली. 
Web Title: Bollywood actress Rishabh Pant took a shot; Wrote 'ha' message!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.