Bollywood actress Alia Bhatt wants to make 'espionage'! But why, read! | बॉलिूवडच्या ‘या’ अभिनेत्रीची आलिया भट्ट हिला करायचीय ‘हेरगिरी’! पण का, वाचा!

होय, तुम्ही वाचलंय ते अगदी खरंय. पण, तिला बॉलिवूडच्या नक्की कोणत्या अभिनेत्रीवर हेरगिरी करायची आहे? आणि ती कशासाठी? अनेक विचार तुमच्या डोक्यात आले असतील. आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की, आलिया भट्ट हिला बॉलिवूडची बेबो आणि पतौडी खानदानाची सून बेगम करिना कपूर खान हिची. आता कशासाठी? तर तिचा लाडका मुलगा तैमूर अली खान याच्यासाठी. कारण तो आलियाला खूप आवडतो. त्याच्या क्यूटनेसबद्दल आलियाला करिनाकडून अजून माहिती काढायची आहे. म्हणून ती करिना कपूरची हेरगिरी करणार असल्याचे कळते आहे. अलीकडेच एका मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, तुला जर खऱ्या आयुष्यात हेरगिरी करायची असेल तर तू कुणाची करशील? त्यावर तिने मोठ्या मिश्किलपणे उत्तर दिले की, मी करिना कपूर खान हिची हेरगिरी करेन कारण तिचा मुलगा तैमूर मला प्रचंड आवडतो. मुलाखतीदरम्यान तिला तिचा ‘डिअर जिंदगी’ को-स्टार शाहरूख खान याच्याबद्दल विचारले असता ती म्हणाली,‘ मी शाहरूखला हे विचारेन की, थोडीशी देखील झोप न घेता तू गाण्यांचे शूटिंग कसे करू शकतोस? तसेच सलमान खान एक खूप चांगला क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहे. एक आर्टिस्ट म्हणून मी त्याला विचारू इच्छिते की, तो बिझी शेड्यूल सांभाळून हे कसे करू शकतो? त्याच्या क्रिएटिव्ह प्रोसेसबद्दल जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. तिचा ‘ब्रम्हास्त्र’ को-स्टार रणबीर कपूरला ती काहीही विचारू इच्छित नाही, कारण, तो एखाद्या खुल्या पुस्तकासारखाच आहे. त्याला त्याच्या जेवण्याच्या पद्धतींबाबत मी काही सांगू इच्छिते.

बॉलिवूडची चुलबुली गर्ल अभिनेत्री आलिया भट्ट हिने तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटात अतिशय उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बॉक्स आॅफिसवर चित्रपट चांगलाच गल्ला जमवत आहे. या चित्रपटात तिने एका गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती एक भारतीय तरूणी असून देखील पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न करते आणि पाकिस्तानात राहून ती भारतीय आर्मीला गोपनीय माहिती पुरवते. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. 
Web Title: Bollywood actress Alia Bhatt wants to make 'espionage'! But why, read!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.