सौंदर्याचा विचार केल्यास कुठल्याही चित्रपटात अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रीच अधिक चर्चेत असतात. त्यांच्या फिगर, ड्रेस, हेअरस्टाइल यासर्वच गोष्टी प्रेक्षकांना घायाळ करणाºया असतात. परंतु काही चित्रपट असे आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रींच्या नव्हे तर अभिनेत्यांच्याच हेअरस्टाइलने प्रेक्षकांना वेड लावले आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटातील अभिनेता रणबीर कपूरच्या हेअरस्टाइलवर सध्या तरुणाई अक्षरश: फिदा झाली आहे. त्याची ही हेअरस्टाइल सर्वत्र फॉलोही केली जात आहे. रणबीरप्रमाणेच आणखीही काही अभिनेते आहेत, ज्यांनी अशाप्रकारची हटके हेअरस्टाइल करून तरुणाईला वेड लावले होते. त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...सलमान खान (तेरे नाम)
‘तेरे नाम’ या चित्रपटात एका आशिकची भूमिका साकारणारा राधे म्हणजेच सलमान खान याच्या हेअरस्टाइलने तर तरुणांवर जणू काही मोहिनीच घातली होती. चेहरा झाकणारे सलमानचे केस अजूनही त्याचे चाहते विसरलेले नाहीत.  जेव्हा सलमानचा हा हटके लूक समोर आला होता, तेव्हा जो-तो अशाप्रकारची हेअरस्टाइल ट्राय करीत होता. विशेष म्हणजे अशी हेअरस्टाइल फॉलो करणाºयांना राधे या नावाने हाक मारली जात असे. आमीर खान (गजनी)
‘गजनी’ या चित्रपटातील आमीर खान याचीही हेअरस्टाइल त्यावेळी चांगलीच गाजली होती. वास्तविक अशी हेअरस्टाइल करणाºयास गजनी किंवा ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’ असे म्हटले जात होते. परंतु अशातही त्याचे चाहते या हेअरस्टाइलवर फिदा झाले होते. खरं तर या हेअरस्टाइलने आमीरला आणि चित्रपटाला एकप्रकारची ओळख निर्माण करून दिली. ‘गजनी कट’ यावेळी चांगलाच चर्चेत आला होता. राहुल रॉय (आशिकी)
पहिल्याच चित्रपटात स्टारडम मिळालेल्या राहुल रॉयचे अभिनयाबरोबरच त्याच्या हेअरस्टाइलचेही अधिक कौतुक केले गेले. त्यावेळी तरुणाईमध्ये ही हेअरस्टाइल खूपच पॉप्युलर झाली होती; मात्र राहुल रॉयला ही हेअरस्टाइल हास्यास्पद वाटायची. एका मुलाखतीत त्याने म्हटले की, वयाच्या १२ व्या वर्षी मॉडेलिंगकरिता मी लंडनला गेलो होतो. त्याठिकाणी मी ही हेअरस्टाइल बघितली. पुढे मीदेखील ही हेअरस्टाइल फॉलो केली. जेव्हा मी महेश भट्ट यांना भेटलो तेव्हा त्यांना माझा हा हेअरकट खूपच आवडला. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी तर मला ‘हीच हेअरस्टाइल तुझी ओळख होईल’ असे भाकीत केले होते, अर्थात ते खरे ठरले. अमिताभ बच्चन 

अ‍ॅँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांची हेअरस्टाइल तर कित्येक काळ बॉलिवूडमध्ये फॉलो केली गेली. केवळ प्रेक्षकच नव्हे तर इतर कलाकारदेखील त्यांची हेअरस्टाइल फॉलो करीत असत. कान अन् शर्टची कॉलर झाकणारे केस बघून प्रेक्षक अमिताभच्या प्रेमात पडायचे. अमिताभला ही हेअरस्टाइल खूपच सूट व्हायची. बरेच प्रेक्षक तर अमिताभचा चित्रपट बघायला जायचे म्हणून अशाप्रकारची हेअरस्टाइल करून चित्रपटगृहात बसायचे. आजही प्रेक्षक अमिताभच्या या हेअरस्टाइलवर फिदा आहेत. 
Web Title: Bollywood actors 'haystyle' s crazy craze for the audience !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.