Bollei Ileana D'cruz on Casting Couch; He said, 'The talk about the subject ends!' | कास्टिंग काउचवर बोलली इलियाना डिक्रूज; म्हटले, ‘याविषयी बोलणाऱ्याचे करिअरच संपून जाते’!

काही काळापूर्वी हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वे विंस्टीनवर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. त्यानंतर हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत बरेचसे स्टार्स कास्टिंग काउचच्या विरोधात आपला आवाज उठवित आहेत. आता यामध्ये अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिचेही नाव जोडले गेले असून, तिने कास्टिंग काउचबद्दल बिनधास्तपणे आपले मत मांडले आहे. इलियानाने म्हटले की, ‘कास्टिंग काउचविरोधात बोलणाºयाचे करिअर पूर्णपणे संपूण जाते.’ हार्वेसारख्या प्रसिद्ध लोकांविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर बºयाचशा मॉडेल आणि अभिनेत्रींनी ‘मी टू’ या हॅशटॅगद्वारे एक अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत जगभरातील लोकांनी आपल्यासोबत घडलेली आपबिती सांगितली. हॉलिवूडबरोबरच बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी या अभियानाचा भाग बनले. 

बॉम्बे टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार इलियानाने म्हटले की, ‘होय, ही गोष्ट ऐकायला थोडीशी विचित्र वाटते. परंतु मी याविषयी पूर्णपणे सहमत आहे की, जो कोणी कास्टिंग काउचबद्दल बोलते त्याचे करिअर संपून जाते. काही वर्षांपूर्वी साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एका ज्युनियर आर्टिस्टने मला विचारले होते की, या सर्व गोष्टी कशापद्धतीने डिल केल्या जातात? तेव्हा मी तिला सांगितले होते की, हे मी तुला सांगू शकत नाही. याबाबतचा निर्णय सर्वस्वी तुझा आहे. कोणीही यासाठी तुझ्यावर दबाव आणू शकत नाही. बºयाचशा लोकांनी असे केले असून, ते सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून होते की, त्यांनी काय करायला हवे. लैंगिक शोषणाबद्दल सांगायचे झाल्यास मी याचे कधीच समर्थन करीत नाही,’ असेही इलियानाने सांगितले. दरम्यान, इलियाना सध्या अभिनेता अजय देवगणसोबत ‘रेड’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. तिचा हा चित्रपट १६ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणसोबत इलियानाची ‘बादशाहो’मध्ये चांगलीच केमिस्ट्री बघावयास मिळाली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी पडद्यावर बघावयास मिळणार असून, त्यास कशा पद्धतीने प्रेक्षक प्रतिसाद देतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
Web Title: Bollei Ileana D'cruz on Casting Couch; He said, 'The talk about the subject ends!'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.