Bold photos shared with Nagarjuna's Sun Sahitya; The anger of the user! | नागार्जुनची सून सामंथाने शेअर केला बोल्ड फोटो; यूजर्सचा झाला संताप!

सुपरस्टार नागार्जुनची सून सामंथा रूथ प्रभूने तिच्या इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो पोस्ट केला. तिचा हा फोटो बघून यूजर्सचा चांगलाच संताप झाला. अनेकांनी तिला संस्काराचे धडे देण्यास सुरुवात केली, तर काहींनी अक्षरश: असभ्य अशा प्रकारच्या कॉमेण्ट्स दिल्या. मात्र अशातही काही यूजर्स सामंथाची बाजू घेताना बघावयास मिळाले. त्यांनी तिचे समर्थन करताना टीका करणाºयांना प्रतिउत्तर दिले. ज्यामुळे ‘यूजर्स विरुद्ध यूजर्स’ असा सामना बघावयास मिळाला. 

दरम्यान, सामंथाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका रिसोर्टच्या समुद्र किनारी दिसत आहे. बिकिनी अंदाजात असलेल्या या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. सामंथाने हा फोटो शेअर करताना लगेचच कॅप्शन असलेला दुसरा फोटो शेअर केला. त्यामध्ये तिने लिहिले की, ‘धाडसी महिला तीच असते जी ते काम करण्याची हिम्मत ठेवते, जे इतरांना योग्य वाटत नाही.’ सामंथाच्या या फोटोवर यूजर्स मात्र संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी तर कुठलाही विचार न करता तिला संस्काराचे धडे देताना आता तू विवाहित असल्याचे म्हटले. 
 

सामंथा विवाहित असून, तिने सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा चैतन्य नागा याच्यासोबत २०१७ मध्ये लग्न केले. २०१५ पासून हे दोघे एकमेकांना डेट करीत होते. जानेवारी २०१७ मध्ये दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर ६ आॅक्टोबर २०१७ मध्ये सुरुवातीला हिंदू आणि त्यानंतर ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. अतिशय शाही पद्धतीने दोघांचा विवाहसोहळा पार पडला. दोघेही गोवा येथे विवाहबद्ध झाले होते. सध्या सामंथा आणि चैतन्य आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत. 
Web Title: Bold photos shared with Nagarjuna's Sun Sahitya; The anger of the user!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.