Bobby Deol's Star Seven Skirmor, took over another Big Budget movie | बॉबी देओलचे स्टार सातवे आसमानपर, हाती लागला आणखीन एक बिग बजेट चित्रपट

सलमान खान ज्याच्या डोक्यावर आपला हात ठेवतो त्या व्यक्तीसाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडून जातात. असेच काहीस झाले आहे अभिनेता बॉबी देओलच्या बाबतीत. गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून लांब असलेले या अभिनेत्याच्या हाती एकामागोमाग एक अनेक चित्रपट लागले आहेत. सलमान खानसोबत सध्या बॉबी 'रेस3'च्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहे. यानंतर बॉबी होम प्रोडक्शनच्या 'यमला पगला दिवाना फिर से'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मात्र यामध्ये बॉबीने एक मोठा चित्रपट साईन केला आहे.  

बॉबीचे स्टार सध्या सातव्या आसमानपर आहेत असे म्हणायला हरकत नाही. त्या मागचे कारण म्हणजे बॉबीची बॅक टू बॅक 3 चित्रपट रिलीज होणार आहेत. 'रेस3' आणि 'यमला पगला दिवाना'नंतर बॉबी आपल्याला 'हाऊसफुल 4' मध्ये पण दिसणार आहे. नुकताच बॉबीने 'हाऊसफुल 4' देखील साईन केला आहे.   

हाऊसफुल 4 मध्ये बॉबी देओलशिवाय अक्षय कुमार आणि रितेश देशमुखसुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट पुर्नजन्माच्या कथेवर आधारित आहे. हाऊसफुल सिरिजचे आतापर्यंत आलेले सगळे चित्रपट हिट गेले आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या सिरिजने चांगला गल्ला जमावला आहे. साजिदसोबत काम करण्याला घेऊन बॉबी देओल म्हणाला कि, ''मी साजिद सोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.  मला नेहमीच साजिदसोबत काम करण्याची इच्छा होती आणि आज ती माझी इच्छा पूर्ण होते आहे.  अक्षयसोबत माझी चांगली मैत्री आहे आणि त्याच्यासोबत काम करायला मजा येते. या चित्रपटाची शूटिंग सुरु होण्याची वाट मी मोठ्या आतुरतेने बघतो आहे. 

ALSO READ :  सलमान खान आला या अभिनेत्याच्या मदतीला धावून

बॉबी देओलने बरसात या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या या चित्रपटात ट्विंकल खन्ना त्याची नायिका होती. या चित्रपटातील बॉबीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम नवोदित अभिनेता या फिल्मफेअर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. पण तुम्हाला माहीत आहे का बरसात हा बॉबी देओलचा पहिला चित्रपट नव्हता. या चित्रपटाच्या आधी त्याने एका चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. 
Web Title: Bobby Deol's Star Seven Skirmor, took over another Big Budget movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.