Bobby Deol's shirtless look on 'ha' turned actor! | बॉबी देओलच्या शर्टलेस लूकवर ‘हा’ अभिनेता झाला फिदा!!

सध्या सुपरस्टार सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ‘रेस-३’ या चित्रपटाच्या ट्रेलरचीच सर्वत्र धूम बघावयास मिळत आहे. सोशल मीडियावर तर ‘रेस-३’ हा ट्रेंड म्हणून चालत आहे. बॉलिवूडमध्ये ‘रेस-३’च्या ट्रेलरने चांगलेच वातावरण तापविले आहे. जेवढी चर्चा सलमानची केली जात आहे, तेवढीच चर्चा अभिनेता बॉबी देओलबद्दलही रंगताना दिसत आहे. कारण ट्रेलरमध्ये केवळ सलमानच नव्हे तर बॉबी देओलही शर्टलेस लूक देताना दिसत आहे. बेयर बॉडी बॉबीला बघून केवळ त्याचे चाहतेच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारही त्याच्यावर फिदा होताना दिसत आहेत. एक अभिनेता तर चक्क हनिमूनवर असतानाही बॉबीचे कौतुक करताना दिसला. 
 
होय, सातासमुद्रापार हनिमूनसाठी गेलेल्या एका अभिनेत्याने बॉबी देओलच्या टोन्ड बॉडीचे असे काही कौतुक केले की, त्याचीही चर्चा यानिमित्त रंगत आहे. अभिनेता अंगद बेदी काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बंधनात अडकला. सध्या तो पत्नी नेहा धूपियासोबत अमेरिकेत हनिमूनसाठी गेला आहे. जेव्हा त्याने ‘रेस-३’चा ट्रेलर बघितला तेव्हा त्याने बॉबीचे कौतुक करण्यास सुरुवात केली. वास्तविक इतर सेलेब्सनेही ‘रेस-३’च्या ट्रेलरचे चांगलेच कौतुक केले. मात्र ज्या शब्दांमध्ये अंगदने बॉबीचे कौतुक केले, त्यावरून तोही चर्चेत आला आहे. ‘रेस-३’चा ट्रेलर बघितल्यानंतर अंगद बेदीने ट्विटरवर लिहिले की, ‘सलमान भाई परतला आहे आणि बॉबी देओलही. बॉबी भाई खूपच चांगला दिसत आहे. मनात धडकी भरविणारा ट्रेलर. जॅकलीन, डेजी शाह, साकिब सलीम सर्वच अचंबित करताना दिसत आहेत. रेमो डिसूझा याच्यासाठी कुठलेच बंधने नाहीत. दरम्यान, अंगदप्रमाणे बॉलिवूडच्या इतरही काही सेलिब्रिटींनी ‘रेस-३’च्या ट्रेलरचे तोंडभरून कौतुक केले. 
Web Title: Bobby Deol's shirtless look on 'ha' turned actor!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.